esakal | Coronavirus : ...अन् 'त्या' व्यक्तीचा अंत्यविधी गावकऱ्यांनी रोखला!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Death

देशात कोरोना बाधितांचा आकडा 400 च्या पुढे गेला आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे.

Coronavirus : ...अन् 'त्या' व्यक्तीचा अंत्यविधी गावकऱ्यांनी रोखला!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता : देशात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीचा अंत्यविधी गावकऱ्यांनी रोखल्याची वृत्त आता समोर आले आहे. गाव वेशीत असलेल्या स्मशानभूमीत जर अंत्यविधी केला तर गावात कोरोना व्हायरस पसरू शकतो, असे काही गावकऱ्यांचे मत होते. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

- बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा बळी ठरलेला हा व्यक्ती इटलीहून आला होता, आणि त्याने ही गोष्ट लपवून ठेवली होती, अशी अफवा गावात पसरवण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांकडून त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला वाईट वागणूक दिली जात होती. मृत व्यक्तीचा मुलगा अमेरिकेतील विद्यापीठात शिकत आहे. मात्र, लॉकडाऊन असल्याने तो भारतात येऊ शकत नाही. मृत व्यक्तीच्या मुलाने पोलिसांना अंत्यविधी करण्यास सांगितले होते आणि परवानगी असेल, तरच अस्थी कुटुंबीयांना देण्यास सांगितले होते. मात्र, गावकऱ्यांनी अंत्यविधी रोखण्यासाठी स्मशानभूमीसमोर गर्दी केली होती.

 - Breaking : आता कोणत्याही बँकेच्या ATM मधून काढा पैसे; तेही चार्जेसविना!

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मंगळवारी (ता.२४) राज्यात दोन कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना बाधितांची संख्या ८ वर पोहोचली आहे. आज सापडलेले दोन्ही रुग्ण हे परदेशात प्रवास करून आले आहेत. त्यापैकी एकजण इंग्लड, तर दुसरा इजिप्तहून आला आहे, अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.  

- Lockdown : नागरिकांनो घाबरू नका; महापालिकेच्या 'या' हेल्पलाईन आहेत ना!

देशात कोरोना बाधितांचा आकडा 400 च्या पुढे गेला आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 3,30,000 लोक कोरोनाग्रस्त आहेत. तर सुमारे 14,000 लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. 

कोरोनाशी निगडीत बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image