प्रेमप्रकरणातून नावगे गावात तुफान राडा; 35 तरुणांनी हातात तलवारी, रॉड, पिस्तूल घेऊन घरांवर केली दगडफेक, गाडीच्या फोडल्या काचा

चेहऱ्यावर मास्क घालून ३० ते ३५ जणांनी हातात तलवार, रॉड, जांबिया आणि पिस्तूल दाखवत एकाला जीवे मारण्याची धमकी दिली.
Belgaum Police love Affair
Belgaum Police love Affairesakal
Summary

नावगे गावामधील तरुण बेळगावला महाविद्यालयात शिकतो. त्या तरुणाचे व दुसऱ्या गावातील तरुणी यांच्यात प्रेम असल्याचे समजते. याला बहाद्दरवाडी गावाच्या तरुणांचा विरोध होता.

बेळगाव : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेमप्रकरणातून (love Affair) नावगे गावात (ता. बेळगाव) तुफान राडा झाला. सोमवारी (ता. १) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास चेहऱ्यावर मास्क घालून ३० ते ३५ जणांनी हातात तलवार, रॉड, जांबिया आणि पिस्तूल दाखवत एकाला जीवे मारण्याची धमकी दिली.

Belgaum Police love Affair
'राजाराम'च्या संचालकाला बेदम मारहाण; पाटील-महाडिक वाद पोहोचला मुद्द्यावरून गुद्द्यावर, राजकीय परंपरेला गालबोट

चारपेक्षा अधिक घरांवर तुफान दगडफेक करून गृहपयोगी साहित्याची नासधूस केली. वाहनांच्या काचा फोडल्या. यात ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने गावात तणाव असून, पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस (Belgaum Rural Police) ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळी मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नावगे गावामधील तरुण बेळगावला महाविद्यालयात शिकतो. त्या तरुणाचे व दुसऱ्या गावातील तरुणी यांच्यात प्रेम असल्याचे समजते. याला बहाद्दरवाडी गावाच्या तरुणांचा विरोध होता. त्यातून मतभेद निर्माण झाले. पंचांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. शिवाय काही तरुणांना समज देण्याचा प्रयत्न केला.

Belgaum Police love Affair
Satej Patil: सतेज पाटील-महाडिक वाद पुन्हा उफाळला! राजाराम साखर कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण

हा राग मनात धरून सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास तुफान दगडफेक केल्याची घटना घडली. पोलिसांनी येथे भेट देऊन बंदोबस्त वाढविला. याबाबत मारुती हिराकडली (वय ५२, रा. रामलिंग गल्ली, नावगे) यांनी मंगळवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात कोणत्या तरी उद्देशाने काही संशयितांनी मिळून फिर्यादी, तसेच गावातील अन्य नागरिकांच्या घराकडे आले. चेहऱ्यावर मास्क घालून ३० ते ३५ जणांनी हातात तलवार, जांबिया, रॉड, पिस्तूल घेऊन आले. ते सर्व शिवीगाळ करू लागले. तसेच ‘बाहेर पड, आज तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकीही देऊ लागले.

घराच्या खिडक्यांची काच, टाईल्स, पार्क केलेल्या मोटारीवर तुफान दगडफेक केली. यात मोटारीसह (केए २२, पी-४९७४) वाहनांचे नुकसान झाले आहे. एक बाईक, दुचाकी (केए २२, एचबी ५३९२) वाहनावरही रॉड व तलवार हल्ला करून नुकसान करण्यात आले. तसेच येथील अर्जुन अण्णाप्पा सुतार, रवळनाथ मल्लाप्पा येळ्ळूरकर व कल्लाप्पा बाळप्पा चिगरे यांच्या घराकडेही ते गेले. या ठिकाणी एका मोटारीचे नुकसान केले आहे. दगडफेकीत शंकर अर्जुन सुतार (वय ६५, रा. नावगे) हे जखमी झाले आहेत. दगडफेकीसह जीवे मारण्याचा प्रयत्न संशयितांनी केल्याबाबत फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा झाला आहे, तर अन्य संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

Belgaum Police love Affair
बदनामीचा कोणी प्रयत्न करत असेल, तर जशास तसे उत्तर देणार; अमल महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा

गावात भीतीचे वातावरण

दरम्यान, २५ ते ३० वयोगटातील तरुणांनी तुफान दगडफेक व पिस्तूल, तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला असून, महिला आणि बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट देत शांतता राखण्याबाबतचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com