Breaking : कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजाराने वाढली; ऊर्जा मंत्रालयात कोरोनाची एन्ट्री!

Corona-Virus
Corona-Virus
Updated on

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीच्या फैलावाचा वेग मागच्या २४ तासांत आणखी वाढला आहे. आज एकूण रुग्णसंख्येत चार हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाचा शिरकाव झालेल्या केंद्रीय मंत्रालयांमध्ये आता ऊर्जा मंत्रालयाचीही भर पडली असून या मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संक्रमण झाल्याचे आज सकाळी निष्पन्न झाले. त्यानंतर श्रम शक्ती भवन इमारत सील करण्यात आली आहे. 

देशात आजपावेतो करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या १६,७३,६८८ झाली असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. कोरोना चाचण्यांच्या केंद्रांची देशभरातील संख्या वाढत चारशेवर गेली असे सरकारचे म्हणणे असले तरी देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे आणि वाढत्या उद्रेकाच्या प्रमाणात ही केंद्रे पुरेशी आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वीच मुलकी विमान वाहतूक मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनात आणि त्यापाठोपाठ ७-८ मंत्रालयांचा कारभार चालणाऱ्या शास्त्री भवनाच्या अधिकाऱ्यांना कोरोना संक्रमण झाल्याचे आढळल्यावर संबंधित इमारती सील करण्यात आल्या होत्या.

आज त्यात श्रम शक्ती भवनाची आणि ऊर्जा मंत्रालयाची भर पडली. याच भवनामध्ये गंगा स्वच्छता आणि जलशक्ती मंत्रालयही आहे. लॉकडाऊन-३ नंतर (१७ मे) सार्वजनिक परिवहन सेवांसह देवा आणि सुविधांना सूट देण्याचा विचार केंद्राच्या पातळीवर सुरू असतानाच केंद्र सरकारच्या मंत्रालयांना एकापाठोपाठ एक बंद करावे लागणे हे काळजीचे कारण यंत्रणेसाठी बनले आहे.. 

रुग्णवाढीचा वेग कायम 
२४ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाउनचा तिसऱ्या टप्प्यानंतर विविध सेवा आणि उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू असतानाच रुग्णसंख्या वाढीचा कहर देशभरात वाढत असल्याचेही आढळत आहे. रुग्णांच्या रोज आढळणाऱ्या संख्येतही हजारोंच्या संख्येने वाढ सुरू झाली असून सरकारने कितीही इन्कार केला तरी सामूहिक संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.

लॉकडाउन संपल्यानंतरच्या तीन आठवड्यांमध्ये रुग्णसंख्येच्या उद्रेकाची भिती आहे. आरोग्य यंत्रणेसमोर हीच चिंता भेडसावत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्र आणि गुजरातसह देशभरात तब्बल ४,२१३ नवे रुग्ण आढळले असून आणखी ९७ जण मृत्युमुखी पडले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com