Delhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात...

वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

दिल्लीत प्रचारासाठी गेलेल्या भाजपा नेत्यांची सोशल मिडीयावर खिल्ली उडविण्यात येत आहे. त्यात आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवर तावडे यांना मिश्कील उत्तर दिले आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 :
नवी दिल्ली : दिल्लीत प्रचारासाठी गेलेल्या भाजपा नेत्यांची सोशल मिडीयावर खिल्ली उडविण्यात येत आहे. त्यात आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवर तावडे यांना मिश्कील उत्तर दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीत भाजप उमेदवाराचा प्रचार करतानाच विनोद तावडे यांचे दोन फोटो केजरीवाल ट्विट केले आहेत. त्याचबरोबर विनोद तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आहेत. ज्यांनी राज्यातील १३०० सरकारी शाळा बंद केल्या. ते आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. दिल्लीकरांनों, आपने खूप मेहनत घेऊन सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दाखवा. ते आपले अतिथी आहेत, अशी टीका केली आहे.

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

महाराष्ट्रातून भाजप नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले असून माजी मुख्यमंत्री फडणवीस, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सुद्धा उमेदवारांचा प्रचार करत आहेत व त्याचे फोटो सोशल मिडियावर टाकत आहेत. विनोद तावडे यांची सोशल मिडियावर नेटीझन्स खूप खिल्ली उडवताना दिसत आहेत. तसेच, फडणवीस यांनी सुद्धा काही फोटो शेअर केले आहेत त्यात मंचावरील व्यक्ती मान कलवून डोळे मिटलेली दिसते आहे. त्यावरून मी बोलत राहीन, बोलत राहीन, बोलत राहीन अशी फडणवीसांची खिल्ली उडवली जात आहे.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

तत्पूर्वी, आयुष्यमान भारत योजना दिल्लीत लागू न केल्याबद्दल फडणवीस यांनी केजरीवाल यांना दोष दिला आहे पण प्रत्यक्षात दिल्लीत सर्वाना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध आहे. श्रीमंत, गरीब असे सर्वच मोफत औषधे, तपासणी, सल्ला, उपचार घेऊ शकतात. पुणे जिल्हात फडणवीस यांच्या काळात योजना लागू केल्यावर सहा महिन्यात फक्त ९१ लोकांनी याचा लाभ घेतला आहे तर दिल्लीतील योजनेचा लाभ लाखो लोकांनी घेतला आहे. आयुष्यमान योजनेच्या दसपट मोठी व  सर्वसमावेशक अशी दिल्लीतील आरोग्य योजना असून, आयुष्यमान भारत योजनेत 5 लाखापर्यंतची खर्च मर्यादा आहे तर, दिल्लीत तीस लाखाचा खर्चही राज्य सरकार करते असे आपचे महाराष्ट्र प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi cm arvind kejriwal slams bjp leader vinod tawde