INDvsNZ : न्यूझीलंड म्हणतंय, 'हीच ती दोघं, ज्यांच्यामुळं आम्ही हरलो!'

टीम ई-सकाळ
Thursday, 30 January 2020

रोहित शर्माने साउदीला शेवटच्या दोन्ही बॉलवर सिक्स ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह भारताने मालिकाही जिंकली.

INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंडमध्ये बुधवारी (ता.29) झालेला तिसरा टी-20 सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. आणि यामध्ये भारताने बाजी मारली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकवेळ भारत हरतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केली. त्याने न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलरला बाद केल्याने भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. 

- INDvsNZ : 'हिटमॅन रोहित'चा सुपरस्ट्रोक; अशी झाली सुपर ओव्हर!

सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने भारतापुढे 18 रन्सचे टार्गेट ठेवले होते. त्यावेळी मैदानात उतरलेल्या के. एल. राहुलने फोर लावल्यानंतर शेवटच्या दोन बॉलमध्ये 10 रन्सची गरज होती. तेव्हा रोहित शर्माने साउदीला शेवटच्या दोन्ही बॉलवर सिक्स ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह भारताने मालिकाही जिंकली. 

- INDvsNZ : किंग कोहलीने मोडले कॅप्टन कूलचे 'हे' दोन रेकॉर्ड्स!

मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर सलामीवीर रोहित शर्माने फटकावलेल्या दोन सिक्सची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या ऑफिशियल ट्विटर पेजवरून मोहम्मद शमी आणि रोहित शर्माचा एक फोटो शेअर केला आणि त्याकडे सगळ्या क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य ओढले गेले. 

- INDvsNZ : 'नेव्हर गिव्ह अप'; किंग कोहलीच्या विराटसेनेनं घडवला इतिहास!

या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये न्यूझीलंडने म्हटले आहे की, 'सेदान पार्कमधील आजची रात्र या दोघांसाठी खास ठरली आहे. सुरवातीला शमीने भारताला पराभूत होण्यापासून वाचविले आणि नंतर रोहित शर्माने सुपर ओव्हरमध्ये सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.' हे ट्विट सध्या व्हायरल होत असून अनेकांनी या फोटोला लाईकही ठोकले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammed Shami and Rohit Sharmas photo shared by New Zealand from their official twitter page