Aligarh Muslim University : कधी दहशतवादी अफझल शहीद म्हटलं तर कधी देवीचा अपमान केला, अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे 7 मोठे वाद

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजेच AMU
Aligarh Muslim University
Aligarh Muslim Universityesakal
Updated on

Aligarh Muslim University : सिमीची स्थापना, अफझल गुरूला शहीदचा दर्जा, जिना यांचा फोटो, भारताच्या विभाजनाची चर्चा आणि हिंदू मुलींना पिवळा हिजाब घालण्याची धमकी यासारखे वाद अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला नवे नाहीत.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजेच AMU. केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील अलीगढच्या बाहेरील 35 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेणारा कॅम्पस. 103 वर्षांचा गौरवशाली इतिहास. उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्ड. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची व्यवस्था. पण तरीही वाद आणि विद्यापीठ समीकरण तसं जवळचं.

Aligarh Muslim University
Health Tips : झटपट Weight Loss करायचाय? मग मखानाच्या या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

सिमीची स्थापना, अफझल गुरूला शहीदचा दर्जा, जिना यांचा फोटो, भारताच्या विभाजनाची चर्चा आणि हिंदू मुलींना पिवळा हिजाब घालण्याची धमकी यासारखे वाद अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला नवे नाहीत. विशेष म्हणजे अनेक वाद होऊनही जिना यांचा फोटो इथून हटविण्यात आलेला नाही.

Aligarh Muslim University
Fasting Tips : दिवसभर उपवास केल्यानंतर लगेचच खाऊ नका हे पदार्थ, आरोग्यावर होतील दुष्परिणाम

प्रसिद्ध समाजसुधारक सर सय्यद अहमद यांनी 1875 साली मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. 9 सप्टेंबर 1920 रोजी हे महाविद्यालय अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारे AMU ने आपली 103 वर्षे पूर्ण केली आहेत. या विद्यापीठाच्या इतिहासावर नजर टाकली तर आजपर्यंत या विद्यापीठाला वादाच्या मोहोळाने घेरलंय. यातले काही असे वाद आहेत जे खूपच गाजले.

Aligarh Muslim University
Workout Tips रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे का? जाणून घ्या फायदे व तोटे

1 - स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी

AMU शी संबंधित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी 1977 मध्ये चांगल्या हेतूने ही संस्था सुरू केली. पण हा हेतू फार काळ टिकला नाही. त्याचा हेतू धोकादायक बनला. संघटनेशी संबंधित तरुणांनी दहशतवादाकडे वाटचाल केली होती. देशविरोधी कारवाया उघडकीस येऊ लागल्या. या संघटनेच्या लोकांनी एकेकाळी तिरंग्याचा अपमान करायला देखील मागेपुढे पाहिलं नाही.

Aligarh Muslim University
Workout Tips रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे का? जाणून घ्या फायदे व तोटे

देशाच्या विविध भागात झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सिमीचे नाव येऊ लागले. आता ती दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा चिंताग्रस्त झाल्या होत्या. कारण आपलीच तरुणाई भरकटण्याच्या मार्गावर होती. अशा परिस्थितीत त्यांना पकडणे कधीकधी कठीण होते. भारत सरकारला सिमीवर बंदी घालणे भाग पडले. आजही त्यांच्या अलीगढ येथील शमशाद मार्केटमधील कार्यालयाला सरकारने टाळं ठोकलंय.

Aligarh Muslim University
Hair Care Tips हेअर डायऐवजी वापरा हळदीचे पॅक, केसांना मिळेल नॅचरल काळा रंग

2 - दहशतवादी अफजल गुरूला शहीदचा दर्जा

भारतीय संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला फाशी दिल्यानंतर एएमयूच्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. मौलाना आझाद लायब्ररीजवळ विद्यार्थ्यांनी नमाज-ए-जनाजा अदा केली. अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात मोर्चा काढून त्याला हुतात्मा असा दर्जा दिला. या घटनेने त्यावेळी बरेच लक्ष वेधले होते. प्रसारमाध्यमांमध्येही याला प्रसिद्धी मिळाली. एएमयू कॅम्पसचे काही दिवस पोलिस छावणीत रुपांतर झाले होते.

Aligarh Muslim University
Traveling Tips : फिरायला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; 'या' पर्यटनस्थळांवर पाऊस कमी होईपर्यंत असणार आहे बंदी!

3- मोहम्मद अली जिना यांच्या फोटोवरून वाद

युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या इमारतीत पाकिस्तानचे जनक म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद अली जिना यांचा फोटो लावल्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाचे रुपांतर हाणामारीत झाले. आंदोलने झाली. फोटो आजही तिथे आहे ही दुसरी बाब आहे.

Aligarh Muslim University
Solo Traveling: एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत आहात? चुकूनही करू नका या 5 चुका

वास्तविक, तत्कालीन खासदार सतीश गौतम यांनी कुलगुरूंना पत्र लिहून जिना यांचे फोटो असण्याच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे पत्र बाहेर येताच गदारोळ सुरू झाला. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. स्टुडंट्स युनियनच्या इमारतीत अनेक व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे आहेत, त्यामध्ये जिनांचाही फोटो असल्याचे सांगण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका होत नसल्याने व ही इमारत बंद असल्याने तो फोटो काढता आला नाही.

Aligarh Muslim University
Balaji Travels: पंक्चरवाला झाला सात लक्झरी कारचा मालक; आता स्वप्न हेलिकॉप्टरचे, वेड लावेल अशी सक्सेस स्टोरी

4- हिंदू देवी-देवतांचा अपमान

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात एका शिक्षकाने उघडपणे आपल्या वर्गात हिंदू देवी-देवतांबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकाला विरोध केल्यावर तो संतप्त झाला आणि आपला मुद्दा योग्य ठरवू लागला. हे प्रकरण फॉरेन्सिक सायन्स विभागाशी संबंधित होते. वर्ग संपल्यानंतर हा प्रश्न संपूर्ण कॅम्पसमध्ये पसरला आणि बाहेरही पोहोचला. गोंधळ सुरू झाला.

हिंदू संघटनांनी निदर्शने केल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि विद्यापीठ प्रशासनाने त्यांना निलंबितही केले. त्यानंतरच गोंधळ शांत झाला. त्याचा परिणाम देशाच्या इतर भागातही दिसून आला.

Aligarh Muslim University
Monsoon Travel Guide : बॅग भरो और निकल पडो! पावसाळ्यातील Holidays स्पेशल बनवतील ही ठिकाणे!

5- विद्यार्थिनींना जीन्स घातल्याबद्दल धमक्या आल्या

एएमयू कॅम्पसमध्ये विद्यार्थिनी जीन्स घालून आल्याने अनेक वाद झाले. विद्यार्थ्याला धमकावल्याने या प्रकरणाने जोर पकडला. यानंतर मुली वसतिगृहातून बाहेर आल्या आणि प्रदर्शन केले. धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. ही बाब 2006 सालची आहे. काही वर्षांनी कुलगुरूही सभ्य पोशाखाबद्दल बोलले.

2020 मध्ये एका वेगळ्या घटनेत, जेव्हा एका हिंदू विद्यार्थिनीने बुरखा घालणाऱ्यांना विरोध केला तेव्हा तिला पिवळा हिजाब घालण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून जागेवर कडक कारवाई सुरू केल्यानंतरच वाद शांत झाला.

Aligarh Muslim University
Travel Packing Tips : लाँग वीकेंडचा प्लॅन असेल तर इतरांपेक्षा या पॅकिंग टिप्स तुमची जास्त मदत करतील

6- पुन्हा एकदा देशाच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाद निर्माण झाला

देशात CAA-NRC आंदोलन सुरू होते. त्याचवेळी जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम एएमयूमध्ये पोहोचला आणि ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून वेगळे करण्याचा फॉर्म्युला सुचवला. आपल्या भाषणात त्याने आसामसह ईशान्येकडील सर्व राज्यांना भारताच्या नकाशापासून वेगळे होण्यास सांगितले. या भाषणानंतर गदारोळ झाला. शरजीलवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Aligarh Muslim University
MSRTC Bus Travel: 15 कोटी ज्येष्ठांकडून लालपरीची सवारी! लातूर विभागातील ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

7- काश्मीर-अरुणाचल भारताच्या नकाशावरून गायब

2018 सालची गोष्ट आहे. असगर वजाहतच्या नाटकाच्या संदर्भात कॅम्पसमध्ये भारताचा नकाशा लावण्यात आला होता, ज्यामध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश दिसत नव्हते. खरे तर अरुणाचल प्रदेशचे वर्णन चीनचा भाग म्हणून केले जात होते. ही माहिती मिळताच निदर्शने सुरू झाली. प्रशासनाने कारवाई केली आणि पोस्टरही हटवण्यात आले आणि नाटकाचे स्टेजही बंद करण्यात आले.

Aligarh Muslim University
Travel Insurance: परदेशात शिक्षण घेताना प्रवास विमा का महत्त्वाचा आहे?

याशिवाय येथील भूगर्भशास्त्र विभागाचा संशोधक विद्यार्थी मन्नान वानी याचे हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याचे समोर आले. मन्नानने सोशल मीडियावर ही माहिती दिली. नंतर लष्कराशी झालेल्या चकमकीत तो मारला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com