
एका 81 वर्षांच्या आजींचा 85 फूट उंचीवरील पोल डान्स व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना सलाम ठोकलाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.
न्यूयॉर्क : एका 81 वर्षांच्या आजींचा 85 फूट उंचीवरील पोल डान्स व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना सलाम ठोकलाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.
पत्नीच्या जाण्यानंतरही पतीने केले 'असं' स्वप्न पूर्ण...
कार्ला वलेन्डा असे 81 वर्षीय आजींचे नाव आहे. कार्ला आजींनी पोल डान्सची आवड आणि कसब या वयातही जपली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्ला आजी 85 फूट उंच असलेल्या पोलवर चढून डान्स करताना दिसतात. त्यांच्यातली ऊर्जा आणि चैतन्य पाहून प्रेक्षकही अवाक होतात. थरारक अनुभव पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारा येतो. पोल डान्स पाहून उपस्थितांनी त्यांना कडक सॅल्युट केला आहे. स्टीव हार्वे यांचा शो लिटिल बिग शॉट्स: फॉरएव्हर यंग शोमध्ये कार्ला आजींनी आपली कला सादर केली. या शोमध्ये वयोवृद्ध कलाकार सहभागी होत असतात.
कार्ला म्हणाल्या, 'मी माझ्या कलेमधून लोकांचं मनोरंजन करते. धाडसी कला सादर करायला मला आवडत आहे. मी वयाच्या 3 वर्षांपासून पोल डान्स करत आहे.' दरम्यान, कार्ला आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आजींची ऊर्जा आणि उत्साह पाहून, त्यांना सलाम ठोकायलाच हवा. त्यांच्या या कलेला तोडच नाही, अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात.