कौतुकास्पद! Medical Studentच्या मदतीने गर्भवती महिलेने ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MBBS Student helped pregnant women to deliver baby

कौतुकास्पद! Medical Studentच्या मदतीने गर्भवती महिलेने ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म

MBBS Student Bravery: रात्री अपरात्री जीव वाचवण्यास तत्पर असणाऱ्या अनेक क्षेत्रांपैकी एक क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र. वैद्यकीय क्षेत्रात दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश घेत असतात. यामागे वैद्यकीय क्षेत्रातून जनतेस मदत करण्याची अनेकांची भावना असते. ट्रेनमध्ये प्रवास करत असणाऱ्या अशाच एका विद्यार्थिनीने एका गर्भवती महिलेचा जीव वाचवत तिची प्रसुती केली आहे. तिच्या या उल्लेखनिय कार्याचं समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होताना दिसतेय.

एक २८ वर्षीय गर्भवती महिला विषाखापट्टनमसाठी प्रवास करत असताना तिला अचानक ट्रेनमध्ये प्रसुतीकळा येण्यास सुरूवात झाली. ही महिला तिच्या पतीसोबत शिकाकुलमपासून विशाखापट्टनमपर्यंतचा प्रवास दुरांतो ट्रेनने करत होती. दरम्यान त्याच कोचमध्ये असणाऱ्या एका विद्यार्थ्यांनीने महिलेच्या तीव्र त्रासाची जाणीव होताच तिची मदत करण्याचे ठरवले.

हेही वाचा: Medical Study : आता हिंदीत शिका MBBS, 'या' राज्याने उचललं पहिलं पाऊल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैद्यकीय विद्यार्थिनी, डॉ. के. स्वाती रेड्डी, विशाखापट्टणमच्या गीतम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GIMSR) मध्ये हाऊस सर्जन आहे. स्वाती वैद्यकीय विद्यार्थिनी असली तरी प्रसुती करण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. त्यामुळे ती घाबरलीही होती. मात्र मोठ्या धैर्याने या विद्यार्थिनीने महिलेची ट्रेनमध्ये प्रसुती केली. महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या विद्यार्थिनीमुळे महिलेची योग्य वेळी प्रसुती होऊन तिचा जीव वाचला आहे. तिच्या या मौल्यवान कार्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.

हेही वाचा: शेतकऱ्याच्या मुलाचे 'MBBS' करून 'UPSC'त यश

या वैद्यकिय विद्यार्थिनीच्या अथक प्रयत्नांबद्दल महिलेच्या कुटुंबियांनी तिचे मनापासून आभार मानत तिच्या कौतुकास्पद कार्याची दाद दिली आहे. विशेष म्हणजे महिलेची प्रसुती ट्रेनमध्ये झाली असली तरी आई आणि महिला दोघेही निरोगी आहे. अनकापल्ली स्थानकावर गाडी रुळावर येताच कुटुंबीयांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत कळवले.

Web Title: A Mbbs Student Helped Pregnant Woman To Deliver Baby In Duronto Express Train Tranvelling To Srikakulam To Visakhapatnam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..