चोराची फजिती! तयारीनिशी मंदिरात चोरी करायला गेला अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

चोराची फजिती! तयारीनिशी मंदिरात चोरी करायला गेला अन्...

माणसाला त्याच्या कर्माची फळे ही भोगावीत लागतात, याचा प्रत्यय एका मंदिरातून दागिने चोरणाऱ्या चोराला आला. आंध्र प्रदेशातील एका मंदिरातून दागिने चोरण्यासाठी स्वत: खोदलेल्या भिंतीच्या भगदाडात चोरच अडकला.सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (a thief got stuck in a hole as he drilled to steal ornaments from a temple in Andhra Pradesh)

हेही वाचा: नातीसाठी 'सैतान' ठरलेल्या पोटच्या गोळ्याला आईनं शिकवला धडा

चोराला मंदिरातील दागिने चोरायचे होते त्यासाठी त्याने एक उत्तम प्लॅन बनवला.चोरी करण्यासाठी त्याने भिंतीला छिद्र खोदले. मात्र त्याचा हा सुपर प्लॅन फसला आणि तो स्वत:च ड्रिल केलेल्या भिंतीच्या भगदाडात अडकला. मंदिराच्या भिंतीत खोदलेल्या भगदाडात अडकल्याने चोराने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली. याला कर्माचे फळ म्हणावे की आणखी काय? चोर रंगेहाथ पकडला. पापा राव (३०) असे या चोरट्याचे नाव आहे.

हेही वाचा: हिजाब वादात अल कायदाची उडी, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याकडून मुस्कान खानचं कौतुक

श्रीकाकुलमच्या किनारी जिल्ह्यातील जामी येल्लम्मा मंदिरातील ही घटना आहे. मंदिराच्या खिडकीचे काच फोडून मूर्तीतील दागिने त्याने लंपास केले.मात्र बाहेर पडताना त्याचा डाव फसला. चोराची त्या भगदाडातातून सुटका करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: A Thief Got Stuck In A Hole As He Drilled To Steal Ornaments From A Temple In Andhra Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top