

Aamir Khan Sonam Wangchuk statement three idiot
esakal
Rancho Character Aamir Khan Reaction : दिल्ली येथे जंतरमंतर येथे सुरु असलेल्या सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणावर अभिनेता आमिर खान यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. '3 इडियट्स' चित्रपटातील रँचो (फुनसुख वांगडू) हे पात्र सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित असल्याची अनेक वर्षांपासूनची धारणा त्यांनी फेटाळून लावली. मात्र, वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत आपण अत्यंत चिंतित असून त्यांनी लवकरच उपोषण मागे घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या समारोप सोहळ्यात 'लगान' चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनासाठी आमिर खान उपस्थित होते. चित्रपटाच्या २५ वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित संवाद सत्रात त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.