डेव्हिड वॉर्नरला 'ऍलन बॉर्डर' तर एलिसे पेरीला 'बेलिंडा क्लार्क' पुरस्कार!

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

महिला क्रिकेटमध्ये एलिस पेरी हिला बेलिंडा क्लार्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला देण्यात येणारा ऍलन बॉर्डर पुरस्कार यंदा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चेंडू कुतरडण्याप्रकरणी एक वर्षाची बंदी संपवून पुनरागमन करताना त्याने हा पुरस्कार पटकाविला आहे. त्याने स्टिव्ह स्मिथला केवळ एका मताने मागे टाकत हा पुरस्कार पटकाविला आहे.

त्याने यापूर्वी 2016 आणि 2017मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे. त्याने 2019मध्ये झालेल्या विश्वकरंडकात 647 धावा केल्या होत्या. विश्वकरंडकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानी होता.

- U19CWC Final : विजयाचा उन्माद बांगलादेशच्या अंगलट; खेळाडूंना भोगावी लागणार फळं!

त्यानंतर ऍशेसमध्ये खराब कामगिरी केल्यावर त्याने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सहा टी20 सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तो या सर्व सामन्यांत पाचवेळा नाबाद राहिला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोच्च 335 धावाही केल्या. 

महिला क्रिकेटमध्ये एलिस पेरी हिला बेलिंडा क्लार्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

- INDvsNZ : आता व्हाइटवॉशची नामुष्की टाळा!

पुरस्कारांची यादी :

सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू- ऍरॉन फिंच
सर्वोत्तम कसोटी खेळाडू- मार्नस लाबुशेन
सर्वोत्तम टी20 खेळाडू- डेव्हिड वॉर्नर
सर्वोत्तम देशांतर्गत खेळाडू- शॉन मार्श

- सानियाने 4 महिन्यात घटवलं तब्बल 26 किलो वजन; पाहा आता ती कशी दिसतेय? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: David Warner and Ellyse Perry won headline prizes at Australian Cricket Awards