
अतिक्रमण काढण्यासाठी पथक घटनास्थळी पोहोचलं असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
सरकारी कामात अडथळा, आम आदमी पार्टीच्या आमदाराला अटक
दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या 'बुलडोझर कारवाई'ला विरोध करणारे आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) आमदार अमानतुल्लाह खान (MLA Amanatullah Khan) यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आलीय. एमसीडीच्या (MCD) कारवाईदरम्यान दंगल आणि सरकारी कामात अडथळा आणण्याच्या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना आधी ताब्यात घेण्यात आलं, नंतर अटक करण्यात आलीय.
दिल्लीतील मदनपूर भागात अवैध अतिक्रमणांविरोधात एमसीडीची कारवाई सुरूय. मात्र, बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी पथक घटनास्थळी पोहोचलं असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आणि जोरदार गोंधळ घालण्यात आला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना (Delhi Police) लाठीमार करावा लागला. यावेळी आपचे आमदार अमानतुल्लाह खान हेही उपस्थित होते. त्यांच्यावर दंगल घडवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. त्यांच्याशिवाय आणखी 6 जणांविरुद्ध या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा: आम्ही कोणत्याही विशिष्ट कुटुंबातून आलेलो नाहीय; पटेलांनी काँग्रेसला फटकारलं
AAP आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आलंय. ट्विट करून त्यांनी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज असंवैधानिक असल्याचं म्हटलंय. अमानतुल्लाह खान यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, भाजपच्या ‘बुलडोझर पद्धती’ला विरोध करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज घटनाबाह्य आहे. आम्ही भाजपच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात आहोत, त्यासाठी कितीही वेळा तुरुंगात जावं लागलं तरी जनतेच्या हक्कासाठी मी नेहमीच आवाज उठवेन, असं त्यांनी नमूद केलंय.
हेही वाचा: संविधानाचे चारही स्तंभ ढासळू लागलेत, तरीही आंबेडकरी चळवळीतील नेते गप्प का?
Web Title: Aap Mla Amanatullah Khan Arrested In Delhi Bulldozer Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..