जयपूरमध्ये आंदोलनात तरुणाकडून हल्ला; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट प्रत्युत्तर देत राजीनाम्याची पुन्हा मागणी

Abhijeet Dipke reaction: कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या प्रचंड गदारोळ आणि हिंसाचारानंतर भाजप कार्यालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
Abhijeet Dipke reaction

Abhijeet Dipke reaction

ESakal

Updated on

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये एका तरुणाने कानशिलात लगावली. यावर प्रतिक्रिया देताना दीपके म्हणाले की, शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहे. ते शांततेने आपला आवाज उठवत राहतील, असे त्यांनी सांगितले. आपण गांधी आणि आंबेडकरांचे अनुयायी असून शांतता आणि प्रेमाने आपला लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या आपल्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com