

Abhijit Deepke
esakal
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या २१व्या दिवशी जंतर मंतर येथून हटवण्यात आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी उपोषण सुरू केले. पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, हे उपोषण त्यांच्यासाठी शारीरिकदृष्ट्या मोठे आव्हान ठरणार असल्याची चर्चा आहे. यामागे केवळ त्यांना उपोषणाचा पूर्वानुभव नसणे हे कारण नसून, त्यांना असलेला मायग्रेनचा त्रासही महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.