साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्लील व्हिडिओ काॅल, पोलिसांकडे तक्रार

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्लील व्हिडिओ काॅल
Sadhvi Pragya Singh Thakur
Sadhvi Pragya Singh Thakuresakal

भोपाळ : भोपाळच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सोशल मीडिया व्हाॅट्सअॅपवर व्हिडिओ काॅलवर अश्लील संदेश पाठवण्यात आला. खासदारांनी टीटीनगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. ठाकूर यांना रविवारी (ता.सहा) सायंकाळी एका मोबाईलवरुन व्हाॅट्सअप व्हिडिओ काॅल आले होते. त्यात खासदार साध्वी प्रज्ञा सिंह (Sadhvi Pragya Singh) यांना अश्लील व्हिडिओ दाखवले आणि पुन्हा मॅसेज केले. जेव्हा त्या बोलल्या नाहीत तेव्हा अश्लील व्हिडिओतून छायाचित्र पाठविले. त्यात खासदार व तरुणीचे रेकाॅर्डिंग होते. व्हाॅट्सअॅप व्हिडिओ काॅल करणाऱ्यांनी मागणी पूर्ण न केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी टीटीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Abusive Whatsapp Call To BJP MP Sadhavi Pragya Singh)

Sadhvi Pragya Singh Thakur
जेवण व्यवस्थित करत नसल्याचा राग अनावर, मुलाने घेतला वडिलांचा जीव

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर (Social Media) व्हाॅट्सअॅप काॅल करुन तरुणींची व्हिडिओ क्लीपिंग चालवून लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळी अनेक दिवसांपासून सक्रिय आहे. छतरपूर जिल्ह्याचे काँग्रेस आमदार नीरज दीक्षित यांच्याबरोबरही अशी घटना घडली आहे. इतर अनेक प्रकरणांमध्ये लोक तक्रारच दाखल करित नाहीत. बदनामीच्या कारणामुळे ती जाळ्यात अडकतात. भाजप (BJP) खासदार यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कधी होईल, हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com