जेएनयूतील हल्लेखोराचा चेहरा स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड, ABVP म्हणते...

वृत्तसंस्था
रविवार, 12 जानेवारी 2020

जेएनयूमध्ये 5 जानेवारीला रात्री गुंडांना काठ्या, लोखंडी रॉड घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची नेत्या आयषी घोषसह 10 जण जखमी झाले होते.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गुंडांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर 'इंडिया टुडे' या वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये एका हल्लेखोराचा चेहरा उघड झाला असून, तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ABVP ने तो आपला कार्यकर्ता नसल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूमध्ये 5 जानेवारीला रात्री गुंडांना काठ्या, लोखंडी रॉड घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची नेत्या आयषी घोषसह 10 जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर देशभर संताप व्यक्त करण्यात आला होता. हल्ल्याप्रकरणी डाव्या संघटनांकडून ABVP वर आरोप करण्यात आले. तर, ABVPने डाव्यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता 'इंडिया टुडे' या वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या हल्ल्यात सहभागी असलेल्या अक्षत अवस्थी या हल्लेखोराचा चेहरा उघड झाला आहे. तसेच त्याची तो कबुली देतानाही दिसत आहे. यासह रोहित शहा, गीता कुमारी (जेएनयू विद्यार्थी संघटनेची माजी प्रमुख) यांचाही समावेश असल्याचा दावा या वाहिनीने केला आहे.

नेतृत्व हिसकावण्यासाठीच 'कॅम्पस'मध्ये राजकीय ढवळाढवळ

या दाव्यानंतर ABVP च्या सचिव निधी त्रिपाठी यांनी निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे, की हल्ल्याचा आरोप असलेला अक्षत अवस्थी हा आमच्या संघटनेचा कार्यकर्ता नाही. तो आमच्या संघटनेच्या कोणत्याही पदावर नाही. इंडिया टुडे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली पोलिसांनी या हल्ल्यामागे डाव्या संघटना असल्याचे सांगितले आहे.

ABVP या स्पष्टीकरणानंतर इंडिया टुडेचे पत्रकार राहुल कंवल यांनी अक्षत अवस्थीचा ABVP च्या आंदोलनांमध्ये असलेल्या सहभागाचे फोटो आणि व्हिडिओ ट्विट केले आहेत. 12 नोव्हेंबरला ABVP ने काढलेल्या रॅलीत अक्षत अवस्थी सहभागी होता, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी नऊ संशयितांची ओळख पटविताना त्यांनी 'जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोषवर हिंसाचाराचा ठपका ठेवला होता. दिल्ली पोलिसांनी संशयितांची सीसीटीव्ही छायाचित्रे माध्यमांसमोर मांडली. यामध्ये "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोष हिच्यासह चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, वासकर विजय, सुचेता तालुकराज, प्रिया रंजन, दोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल यांचा समावेश आहे. हिंसाचारप्रकरणी आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून, अद्याप कोणत्याही संशयिताला अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ABVP link with JNU student exposed in India Today sting operation