रजनीकांत म्हणतात 'नो पॉलिटिक्स', आरोग्याचे कारण देत राजकारणातून माघार

rajnikanth
rajnikanth

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आरोग्याचे कारण सांगून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, मी जनतेसाठी इथून पुढेही काम करतच राहिन, असं त्यांनी म्हटलंय. एका पत्राद्वारे त्यांनी आपली भुमिका जाहीर केली आहे. 

रजनीकांत यांनी जानेवारी 2021 मध्ये राजकीय पक्ष स्थापन करणार असल्यांच जाहिर केलं होतं. याबाबत 31 डिसेंबर रोजी घोषणा करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यांनी याबाबत एक टि्वट केलं असून त्यात म्हटलं की, चला आता परिवर्तन घडवूयात, आता नाही तर कधीच नाही. त्यांनी पुढे म्हटलं होतं की, आगामी विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. आम्ही जनतेला एक पारदर्शी, भ्रष्टाचार मुक्त आणि कोणत्याही धार्मिक-जातीयवाद न करणारे सरकार देऊ. रजनीकांत हे पूर्वीपासून तामिळनाडूमधील जनतेला एक राजकीय पर्याय देण्याबाबत बोलत होते. आता त्यांनी त्या दिशेने आपले पाऊल उचलले आहे, असं वाटत होतं. 

मात्र पक्षस्थापनेच्या घोषणेच्या आधीच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍटमिट करण्यात आलं होतं. उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांनंतर त्यांना तातडीने हॉस्पिटमध्ये हलवण्यात आलं होतं जिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतंच रजनीकांच यांच्या 'अन्नाथे' या सिनेमाचं हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमधील शूटींग थांबवण्यात आलं होतं.

या सिनेमाच्या टीममधील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी सिनेमाच्या प्रोडक्शन हाऊस यांनी ट्विट करत दिली होती. यानंतर रजनीकांत आणि सिनेमाच्या टीममधील इतर सदस्यांनी कोरोनाची टेस्ट केली असता ती निगेटीव्ह आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र यानंतर रजनीकांत यांनी स्वतःला घरात क्वारंटाऊन केलं होतं. काही वेळापूर्वी त्यांचा रक्तदाबामध्ये अचानक चढ-उतार झाल्यांने त्यांना लगेचच उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com