esakal | दुसरीतील मुलीने किली मांजारोवर फडकवला तिरंगा; आशियातील सर्वात कमी वयाची गिर्यारोही

बोलून बातमी शोधा

kili manjaro.j}

आंध्र प्रदेशच्या एका ९ वर्षाच्या मुलीने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर (Africa's highest peak) सर केले आहे.

दुसरीतील मुलीने किली मांजारोवर फडकवला तिरंगा; आशियातील सर्वात कमी वयाची गिर्यारोही
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशच्या एका ९ वर्षाच्या मुलीने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर (Africa's highest peak) सर केले आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, अनंतपुरच्या कदाप्पल ऋतविका श्रीने  (Kadapala Rithvika Sri) २५ फेब्रुवारीला माऊंट किलिमांजारोची (Mount Kilimanjaro) चढाई केली होती. दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या ऋतविकाने आपले वडील आणि गाईडसोबत मिळून समुद्र सपाटीपासून ५६८१ मीटर उंच गिलमॅन पॉईंट सर केलं. हे यश मिळवल्याने तंजानियामध्ये असलेल्या शिखरावर चढाई करणारी ऋतविका सर्वात कमी वयाच्या व्यक्तींपैकी (youngest persons to scale the mountain) एक ठरली आहे. 

माऊंट किलिमांजारो एक निष्क्रिय ज्वालामुखी आणि जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक आहे. याची उंची १९,३४० फूट आहे. गिल्मन पॉईंट  (Gilman's Point) माऊंट किलिमांजारोच्या तीन उंच शिखर बिंदूंपैकी एक आहे. जे गिर्यारोही या ठिकाणापर्यंत पोहोचतात त्यांना अधिकृतरित्या किलिमांजारो सर केल्याचं प्रमाणपत्र मिळते. 

बाबोव! चहाच्या एका कपाची किंमत 1000 रूपये, जाणून घ्या इतका महाग का?

न्यू इंडियन एक्सप्रेसनुसार, ऋतविकाचे वडील कदाप्पल शंकर ग्रामीण विकास ट्रस्ट अनंतपुरच्या विशेष ओलंपिक भारत विंगमध्ये क्रिकेट कोच आणि खेळ समन्वयक आहेत. त्यांनी मागील वर्षी हे शिखर सर केले होते. यावर्षी त्यांनी त्यांच्या मुलीला सोबत नेलं होतं. आयएएस अधिकारी गंधम चंद्रुडु  (IAS officer Gandham Chandrudu) यांनी रविवारी एक ट्विट करत या मुलीचे कौतुक केले आहे. त्यांनी ऋतविकाला शुभेच्छा देताना म्हटलंय की, 'तू अनेक संकटांवर मात करत यश प्राप्त केलं आहे. त्यामुळे प्रेरणा मिळते'. 

मोदींच्या कौतुकानंतर काँग्रेस कार्यकर्ते भडकले; गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जाळला

श्री चंद्रुडु यांनी या अभियानासाठी एका निधीअंतर्गंत २.८९ लाख रुपयांची मदत पिता आणि मुलीला केली आहे. ऋतविकाने किलिमांजारो जिंकण्यासाठी तेलंगानामध्ये रॉक क्लाईम्बिंग स्कूलमध्ये लेवल १ चे प्रशिक्षण आणि लडाखमध्ये लेवल २ चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.  ऋतविकाच्या वडिलांनी सांगितलं की, तिने मोठ्या उत्साहाने गिर्यारोहण अभियानात भाग घेतला होता आणि पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश प्राप्त केलंय.