
अमेरिकेतून परतलेल्या जोडप्याची दुसऱ्याच दिवशी हत्या; नोकर अटकेत
चेन्नई : कालच अमेरिकेतून परतलेल्या चेन्नईतील एका जोडप्याची त्यांच्यासोबत राहणाऱ्या नोकरांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या झालेल्यांमध्ये 60 वर्षीय श्रीकांत आणि त्याची 55 वर्षीय पत्नी अनुराधा असे या जोडप्याचे नावे आहेत, श्रीकांत हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या नऊ किलो सोन्यासह ५ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहे आरोपींनी दाम्पत्याची त्यांच्या घरात अत्यंत निर्घृण हत्या केली आणि मृतदेह चेन्नईबाहेरील त्यांच्या फार्महाऊसमध्ये पुरला. नेपाळमधील त्यांच्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी आरोपी आणि आंध्र प्रदेशातील आणखी एका साथीदाराला अटक केली.
अमेरिकेत राहणाऱ्या या जोडप्याच्या मुलीने तिच्या पालकांशी संपर्क होत नसल्याने स्थानिक नातेवाईकांशी संपर्क केला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. दोघा मृतांचे मोबाईल बंद होते.
दोन आरोपी, घरकाम करणरा नोकर कृष्णन जो एक ड्रायव्हर आहे आणि त्याचा मित्र रवी, हे दोघे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी आंध्र प्रदेशच्या ओंगोल येथून त्यांना अटक केली. त्यांनी देश सोडण्यापूर्वी त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टमचा वापर केला. चेन्नई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी डॉ. कन्नन म्हणाले, "आम्ही सीसीटीव्ही रेकॉर्डरसह महत्त्वाचे पुरावे सुरक्षित केले आहेत जे आरोपींनी काढून घेतले होते. आमच्याकडे दोषी ठरविण्यासाठी एक मजबूत केस आहे," असे चेन्नई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी डॉ.
आरोपीचा असा विश्वास होता की, या जोडप्याकडे नुकत्याच झालेल्या रिअल इस्टेट डीलमधून त्यांच्या घरी 40 कोटी रुपये रोख रक्कम आहे आणि त्यांनी ते लुटण्याची योजना आखली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.