Agneepath Scheme: क्लासेसवाल्यांनी हिंसाचारासाठी भडकावलं? व्हिडीओ, मेसेज व्हायरल

हिंसाचारासंदर्भात क्लासेसच्या नावाचे काही व्हिडीओ आणि व्हाट्सअप मेसेज व्हायरल झाले आहेत.
Agneepath Row
Agneepath RowSakal

पटना : केंद्र सरकारने अग्निपथ लष्कर भरती योजना सुरू केल्यानंतर देशभरात निदर्शने केले जात आहेत. दरम्यान बिहारमधील पटना येथे हिंसाचार करणाऱ्यांविरोधात बिहार सरकारने कारवाई सुरू केली असून हिंसाचारासंदर्भात क्लासेसच्या नावाचे काही व्हिडीओ आणि व्हाट्सअप मेसेज व्हायरल झाले आहेत. यासंदर्भात डीएम चंद्रशेखर सिंह यांनी या हिंसाचारासंदर्भात माहिती देताना कोचिंग क्लासेसवर आक्षेप घेतला आहे.

(Agneepath Scheme Row)

जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सांगितलं की, पटना येथे हिंसाचार करण्याऱ्या आंदोलकांना अटक केल्यावर त्यांच्यातील काही विद्यार्थ्यांच्या मो कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर कोचिंग सेंटरचे व्हिडीओ आणि मेसेज आढळले आहेत. त्या मेसेजच्या माध्यमातून तरूणांची माथी भडकावण्याचे काम केले गेले आहे. त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे." असं जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितलं आहे.

Agneepath Row
Agnipath म्हणजे नो रँक-नो पेन्शन, ओन्ली टेन्शन; काँग्रेसचा हल्लाबोल

दरम्यान पटना मध्ये सुरक्षा दलांच्या जवानांना तैनात केलं असून आत्तापर्यंत जवळपास ४६ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दानापूर येथे रेल्वेची तोडफोड केल्याच्या आरोपावरून जवळपास १७० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान देशभर उसळलेल्या या हिंसाचारामुळे बिहारमधील १२ जिल्ह्यात इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये रोहतास, लखीसराय, औरंगाबाद, कैमूर, भोजपूर, बक्सर, सारण, समस्तीपूर, बेगूसराय, नवादा, चंपारण आणि वैशाली या जिल्ह्यांचा सामावेश आहे.

बिहारमधील केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध करत आंदोलकांनी २७ रेल्वे स्टेशनवर तोडफोड केली आहे. मागच्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये हिंसक आंदोलन चालू असून एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी पोलिस कर्मचारी, त्यांचे वाहने, भाजपाचे कार्यालये इत्यादी ठिकाणी तोडफोड केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com