FIR नंतर ओवैसींना आणखी एक झटका; 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Summary

सोशल मीडियावर द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.

नवी दिल्ली : भडकाऊ वक्तव्ये आणि सोशल मीडियावर (Social Media) द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठी कारवाई केलीय. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्याविरोधात एफआयआर (FIR) नोंदवल्यानंतर पक्षाला आता आणखी एक धक्का बसलाय. गुरुवारी नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनबाहेर (Delhi Police) निदर्शनं आणि घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी 30 कार्यकर्त्यांना अटक केलीय.

पोलिसांनी आयपीसी (IPC) 186/188/353/332/147/149/34 कलमान्वये अटक केलीय. आयपीसीचं हे कलम अधिकृत कामात अडथळा आणणं, दंगल किंवा हिंसाचार घडवण्यासाठी जमावात सामील होणं आणि गुन्हेगारी कृत्यासाठी एकत्र येणं यासंबंधी आहे. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हे कार्यकर्ते पोलिस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. दरम्यान, ओवेसींविरोधातील एफआयआरचं प्रकरणही समोर आलंय. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

Asaduddin Owaisi
विरोधी पक्षाचा 'बिगर काँग्रेसी' राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असणार?

दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटनं काल असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी यती नरसिंहानंद (Swami Yeti Narasimhanand) यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषणं दिल्याबद्दल एफआयआर नोंदवलाय. यापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटनं नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह 9 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. यामध्ये शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com