

Air India Employee Wife Death crime news
esakal
Air India employee wife : सेक्टर-७१ येथील सीएचडी एव्हेन्यू सोसायटीमध्ये एअर इंडिया ट्रेनिंग अकादमीत कार्यरत कर्मचाऱ्याच्या पत्नीने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या वेळी त्यांची नऊ वर्षांची मुलगीही घरात होती. पती-पत्नीमध्ये पतीच्या मोबाइलमध्ये एका महिला सहकाऱ्यासोबतचा फोटो पाहिल्यानंतर दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता. यानंतर किर्तीमयी यांनी टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बादशाहपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.