फुकट्या VVIP व्यक्तींमुळे एअर इंडियाचं 'लँडिंग'; तब्बल 'इतके' कोटी रुपये थकीत!

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

एअर इंडियाच्या मालकीची विमाने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना खासगी वापरासाठी दिली जातात. या वाहतुकीचा खर्च हा साधारपणे त्या त्या मंत्रालयांकडून दिला जातो.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या एअर इंडिया कंपनीचे इमर्जन्सी लँडिंग होण्यामागे देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची फुकटेगिरी कारणीभूत असल्याचे ‘आरटीआय’च्या माध्यमातून मागविण्यात आलेल्या माहितीतून उघड झाले आहे. या बड्या मंडळींनी वापरलेल्या चार्टर (खासगी) विमानांचे ८२२ कोटी रुपयांचे भाडे अद्याप थकीत असल्याचे दिसून आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कमोडोर लोकेश बात्रा (निवृत्त) यांनी सध्या एअर इंडियाला अन्य किती लोकांकडून येणी आहेत याची माहिती मागविली होती. त्यासंदर्भात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतचा विचार करता व्हीव्हीआयपी मंडळींनी वापरलेल्या चार्टर्ड विमानांचे ८२२ कोटी रुपयांचे भाडे थकीत असल्याचे उघड झाले.

- भारतीय गोलंदाजांनो आगोदर ग्राऊंडबद्दल जाणून घ्या; प्रशिक्षकांचे मत

यामध्ये सुटकेसाठीच्या मोहिमेचे ९.६७ कोटी आणि परकी पाहुण्यांच्या वाहतुकीसाठीच्या १२.६५ कोटी रुपयांचाही समावेश आहे. एअर इंडियाकडून तिच्या मालकीची विमाने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना खासगी वापरासाठी दिली जातात. या वाहतुकीचा खर्च हा साधारपणे त्या त्या मंत्रालयांकडून दिला जातो. 

- स्वित्झर्लंड जगातील सर्वांत महाग देश; भारत-पाकिस्तान ठरले...

अधिकारी बुडवाबुडवीत आघाडीवर 

या बड्या मंडळींप्रमाणेच सरकारी अधिकारीवर्ग देखील बुडवाबुडवीमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या मंडळींकडूनही ५२६.१४ कोटी रूपये येणे बाकी आहे. ही आकडेवारी ३१ मार्च २०१९ पर्यंतची आहे. एकूण ५२६.१४ कोटी रुपयांपैकी २३६.१६ कोटी रुपये हे मागील तीन वर्षांमधील आहेत. कंपनीचे २८१.८२ कोटी रुपये कंपनीने बुडीत खात्यात टाकले असून ते वसूल होण्याची शक्यता कमीच आहे. 

- ...अन् 328 दिवसांनी ख्रिस्तीना परतली पृथ्वीवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India has dues of over Rs 822 crore towards VVIP charter flights