स्वित्झर्लंड जगातील सर्वांत महाग देश; भारत-पाकिस्तान ठरले...

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

रात्रीच्या अंधारात सूर्याचे दर्शन जेथे होते, त्या नॉर्वेचा महाग देशांच्या यादीत क्रमांक दुसरा आहे.

न्यूयॉर्क : युरोपमधील स्वित्झर्लंड निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच पर्यटकांचा आवडता आहे. 86 लाख लोकसंख्या असलेला हा देश जगातील सर्वांत महाग देश ठरला आहे. याच वेळी सर्वांत स्वस्त देशांच्या यादीत पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तान व भारत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्राला वाहिलेले मासिक 'सीईओ वर्ल्ड'ने जगातील 132 देशांची पाहणी करून क्रमवारी जाहीर केली आहे. रात्रीच्या अंधारात सूर्याचे दर्शन जेथे होते, त्या नॉर्वेचा महाग देशांच्या यादीत क्रमांक दुसरा आहे. नॉर्वेची लोकसंख्या 53.6 लाख आहे. आइसलॅंड हा 3.63 लाख लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असणारा देश तिसरा आहे. 

- भारतीय कलाकारांना नाचवून 'तो' भारतविरोधी कारवायांनाच करायचा फंडिंग

पाहणीसाठी तीन निकष 

- पाहणीसाठी तीन निकष ग्राह्य 
- संबंधित देशांतील घरांचे भाडे, किराणा माल आणि हॉटेलमधील पदार्थांच्या किमतींचा समावेश 
- याचबरोबर कपडे, टॅक्‍सीचे भाडे, इंटरनेटचे शुल्क यांचाही विचार 
- या निकषांवरून'सीईओ वर्ल्ड'ने क्रमवारी ठरवून गुणांक दिले आहेत 
- स्वित्झर्लंडला सर्वाधिक 122 गुणांक, तर पाकिस्तानला 21.98 आणि भारताला 24.58 गुणांक आहेत.

- 'पंतप्रधान मोदी 'त्या' मुद्द्यावर एक शब्दही बोलले नाही'; राहुल गांधींची टीका

प्रत्येक देशाच्या राजधानीचे सर्वेक्षण 

- जगात सातत्याने वर जाणाऱ्या औद्योगिक निर्देशांकाचा आढावा घेणे हा या पाहणीचा उद्देश 
- सर्व 132 देशांच्या राजधानीत सर्वेक्षण करून क्रमांक निश्‍चिती 
- राजधानीतील प्रसिद्ध हॉटेल आणि उच्चवर्गीयांच्या गृहकुल संकुलांची पाहणी 
- विशेष म्हणजे जगातील मोठे आणि शक्तिशाली देश या क्रमवारीत मागे पडले आहेत 

सर्वांत स्वस्त पहिल्या दहा देशांची क्रमवारी व गुणांक (सतत युद्धाच्या छायेत असलेला सीरिया भारतापेक्षाही महाग आहे.) 

1) पाकिस्तान : 21 
2) अफगाणिस्तान : 24 
3) भारत : 24 
4) सीरिया : 25 
5) उझबेकिस्तान : 26 
6) किरगिझस्तान : 26 
7) ट्युनेशिया : 27 
8) व्हेनेझुएला : 27 
9) कोसोवो : 28 
10) जॉर्जिया : 28 

- अजबच!!! किचनच्या नळातून पाण्याऐवजी वाईन आली अन्....

जगातील पहिले दहा महाग देश व त्यांचे गुणांक 

1) स्वित्झर्लंड : 122 
2) नॉर्वे : 101 
3) आइसलॅंड : 100 
4) जपान : 83 
5) डेन्मार्क : 83 
6) बहमास : 82 
7) लग्झेंमबर्ग : 81 
8) इस्राईल : 81 
9) सिंगापूर : 81 
10) दक्षिण कोरिया : 78 

या यादीत मागे पडलेले मोठे व बलाढ्य देश (क्रमांक व गुणांक) 

14) फ्रान्स : 74 
16) ऑस्ट्रेलिया : 73 
20) अमेरिका : 71 
24) कॅनडा : 67 
27) ब्रिटन : 67 
28) इटली : 67 
29) जर्मनी : 65 
80) चीन : 40 
82) रशिया : 39 
86) इराण : 39


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Switzerland remains the richest country in the world