

Middle East Conflict Hits Indian Alcohol Industry
Esakal
Alcohol Companies Seek Permission for Price Hike मध्य पूर्वेतील तणावामुळे जगभरात ऊर्जा संकट अजूनही कायम आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता थांबण्याच्या शक्यतेनं दिलासा मिळाला आहे. मात्र युद्धामुळे कच्च्या तेलापासून शेअर बाजारापर्यंत परिणाम दिसून येत आहे. भारतात मद्य उद्योगावरही याचा परिणाम होत आहे. देशातील अनेक मद्य आणि बीअर उत्पादन कंपन्यांनी राज्य सरकारकडे किंमती वाढवण्याची मागणी केलीय. पश्चिम आशियातील संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालीय. यामुळे बाटली, कॅन, पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे. भारतीय बनावटीची परदेशी दारू, बीअर आणि वाईनच्या किंमतीत यामुळे वाढ करावी अशी मागणी होत आहे.