'Chandrayaan 2 यशस्वी झाले नसेल; पण संपलंही नाही'

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लँडरचा 'इस्रो'च्या मुख्यालयाशी संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला.

नवी दिल्ली : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लँडरचा 'इस्रो'च्या मुख्यालयाशी संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. तरीदेखील शास्त्रज्ञांच्या या कार्याचा भारतासह जगभरातील अनेक माध्यमांकडून कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

चांद्रयान 2 ही मोहीम जरी यशस्वी होऊ शकली नाही. तरीदेखील सर्वकाही संपलेले नाही. या मोहिमेनंतर अमेरिकेतील मासिक 'वायर्ड'ने लिहिले, की चांद्रयान-2 चा लँडर मार्गावरुन भरकटलेला असला तरी मोहिमेसाठी सर्व काही संपलेले नाही. चंद्रावर उतरणाऱ्या विक्रम लँडर आणि त्यातील विक्रम रोव्हरचा तुटलेला संपर्क हा भारताच्या अवकाश कार्यक्रमासाठी एकप्रकारे धक्काच आहे.

Chandrayaan 2 : 'विक्रम'चा संपर्क तुटला, हिंमत कायम 

या मोहिमेसंदर्भात 'वॉशिंग्टन पोस्ट'ने म्हटले, की चंद्रावर लँडिंगची प्रक्रिया सुरु असताना भारताचा लँडरसोबत संपर्क तुटला. भारताच्या वाढत्या अवकाश महत्वाकांक्षेला हा एकप्रकारचा धक्का आहे. आत्तापर्यंत 38 वेळा चंद्रावर 'सॉफ्ट लँडिंग'चे प्रयत्न झाले. त्यातील फक्त काही वेळा यश मिळाले. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले होते. भारताच्या चांद्रयान-2 या मोहिमेमुळे चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरेल, अशी अपेक्षा होती. 

Chandrayaan 2 : देश तुमच्या पाठिशी, हिंमत हारू नका : मोदी

तसेच 'न्यूयॉर्क टाइम्स'कडूनही कौतुक केले जात आहे. त्यामध्ये लिहिले, की चांद्रयान-2 चा लँडर चंद्रावर उतरु शकला नाही. असे असले तरीदेखील ते अंशत: अपयश आहे. ऑर्बिटर कार्यरत राहणार आहे. फक्त चंद्रावर पोहोचणाऱ्या देशांमध्ये भारताला थोडा वेळ लागेल. 

Video : इस्त्रोच्या अध्यक्षांना अश्रू अनावर; मोदींकडून सांत्वन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All is not lost foreign media reacted to Isro losing contact with Chandrayaan 2 lander