Arvind Kejriwal : केजरीवालांना ‘इन्शुलिन’ दिले जात नसल्याचा आरोप

मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर केजरीवाल यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal esakal

नवी दिल्ली ः ‘‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात हत्या करण्याचा कट रचण्यात आला असून मधुमेह असूनही त्यांना इन्शुलिनचे इंजेक्शन दिले जात नाहीये’’ असा आरोप आम आदमी पक्षाकडून(आप) रविवारी करण्यात आला. मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर केजरीवाल यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही ‘आप’ नेते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Arvind Kejriwal
Fire News: मोठा अनर्थ टळला ; खासगी बसला लागली भीषण आग मात्र..

तिहार तुरुंगात सामान्य आजारांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. तेथे मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर नसल्याचे तुरुंग प्रशासनाने ‘एम्स’ रुग्णालयाला पाठवलेल्या पत्राद्वारे स्पष्ट झाले आहे, असे सांगून भारद्वाज म्हणाले की, दिल्लीच्या लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला इन्शुलिनपासून वंचित ठेवले जात आहे. केजरीवाल यांना वीस वर्षांपासून मधुमेह आहे. मागील १२ वर्षांपासून ते इन्शुलिन घेत आहेत. दररोज ते ५० युनिट इन्शुलिन घेतात. त्यामुळे सध्या त्यांना इन्शुलिनची गरज आहे, मात्र तिहार तुरुंगात त्यांना ते दिले जात नाहीये.

Arvind Kejriwal
Nashik Crime News : अवैध धंद्यांविरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई; आचारसंहितेच्या महिनाभरात 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने केलेल्या आरोपांचे नायब राज्यपालांच्या कार्यालयाने खंडन केले आहे. अटक होण्याच्या काही दिवस आधी केजरीवाल यांनी इन्शुलिन घेणे बंद केले होते. ते मेटमार्फिन नावाच्या मधुमेह नियंत्रणात ठेवणाऱ्या गोळ्या घेत होते, असे नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

अरविंद केजरीवाल हे सिंहासारखे निडर आहेत. देशातील नागरिकांचे आयुष्य अधिक चांगले कसे करता येईल यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. ते तुरुंगातही भारत मातेचा विचार करत आहेत

- सुनीता केजरीवाल,अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com