हल्ल्यानंतरही 'बम बम भोले'च्या गजरात भाविक यात्रेसाठी रवाना

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

आज पहाटे तीनच्या सुमारास जम्मू बेस कॅम्पहून 3279 भाविकांचा जत्था पहलगाम आणि बालटालकडे रवाना झाला. यावेळी भाविकांनी बम बम भोले, हर हर महादेवच्या गजर करत आपला उत्साह कमी होऊ दिला नाही.

श्रीनगर - अमरनाथ यात्रेतील भाविकांवर सोमवारी रात्री दहशतवादी हल्ला होऊनही आज (मंगळवार) पहाटे भाविकांचा जत्था अमरनाथ गुफेकडे रवाना झाला. हल्ल्यानंतरही यात्रेकरुंच्या उत्साह कमी झाला नसल्याचे दिसत होते.

अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर 'सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीनगरला हलविण्यात आले आहे. तर, काही जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून दिल्लीला नेण्यात येणार आहे.

आज पहाटे तीनच्या सुमारास जम्मू बेस कॅम्पहून 3279 भाविकांचा जत्था पहलगाम आणि बालटालकडे रवाना झाला. यावेळी भाविकांनी बम बम बोले, हर हर महादेवच्या गजर करत आपला उत्साह कमी होऊ दिला नाही. हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेवर यापूर्वी 2000 मध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर आता पुन्हा हल्ला झाला आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​

Web Title: Amarnath Attack: Bodies of Victims Airlifted to Delhi; Yatra to Continue