Gujrat Election : अमित शहा मैदानात! गुजरातसाठी भाजपची खास रणनीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

Gujrat Election : अमित शहा मैदानात! गुजरातसाठी भाजपची खास रणनीती

Amit Shah On Gujrat Election : गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपनेही या लढतीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली असून, गृहमंत्री अमित शाहांनी शनिवारी अहमदाबाद येथून परदेशात स्थायिक असलेल्या गुजराथी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारने गुजरातच्या विकासासाठी काम केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला जागतिक स्तरावर वेगळी ओळख दिली आहे.

हेही वाचा: आम्ही तीन लग्न करून बायकांना मान देतो, तुम्ही तर...; MIM नेत्याचं वादग्रस्त विधान

शह म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या विजयात परदेशी गुजरातींनी (NRGs) नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. गुजरातमधील खेड्यापाड्यातील रहिवासी हे लोक रोल मॉडेल म्हणून ओळखतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे परदेशात स्थायिक असलेल्या एनआरआय नागरिकांनी भाजप आणि नरेंद्रभाईंचा संदेश आणि देशाच्या विकासाचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी भाजपचे दूत बनण्याचे आवाहन केले आहे. यावेऴी त्यांनी परदेशात राहणाऱ्या गुजरातींचे कौतुक केले.

हेही वाचा: Video : सोशल मीडियावर परदेशी पाहुण्यांच्या हनुमान चालीसेची धूम; तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध

ते म्हणाले की, गुजराती जिथे जिथे स्थायिक आहेत, त्यांनी त्या राष्ट्रांचा गौरव केला आहे आणि देशाच्याच नव्हे तर, संपूर्ण जगाच्या विकासात योगदान दिले आहे. 1990 पासून जेव्हा-जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा गुजरातच्या जनतेने भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे ते म्हणाले. परदेशात राहणाऱ्या गुजरातींचाही या विजयांमध्ये महत्त्वाचा वाटा होता. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही पंतप्रधान मोदींनी विकासाला नवी दिशा दिली. घराणेशाही, जातिवाद आणि तुष्टीकरण याशिवाय निवडणुकीचे राजकारण शक्य आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा: 'हनिमूनला गेलेलं कपल अजून काय करणार..', '36 गुण' सिनेमातील बोल्ड सीनवर स्पष्टच बोलली पूर्वा पवार ...

यावेळी अमित शाहांनी मागील काँग्रेस सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आजचा भारत जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेस सरकारमध्ये दहशतवादी हल्ले नियमित होत होते. मात्र, आजच्या भारतात सर्जिकल स्ट्राईकने दहशतवादाचा सामना केला जात आहे.