अमृतसरच्या सुवर्ण मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; लंगरच्या जेवणात होणार बदल

amritsar golden temple gurdwara langar decides organic farming
amritsar golden temple gurdwara langar decides organic farming

चंदिगड : लंगरसाठी वापरण्यात येणाऱ्या भाजी व इतर पदार्थांच्या उत्पादनासाठी आता सुवर्ण मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. लंगरसाठी स्वतः सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) सचिव सुखदेवसिंग भुरा यांनी दिली आहे.

देशभरातील गुरुद्वारांमध्ये लंगरसाठी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे भाजीपाला पुरवला जातो. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची पंजाबसह भारतभरात १३ हजार एकर जमिन आहे. या जमिनीवरील शेतीच्या माध्यमातून ‘एसजीपीसी’ भारत भरातील ६० गुरुद्वारांसाठी भाजीपाला पुरवण्याचे काम करते. तसेच चंडिगड येथील सुवर्ण मंदिरातील लंगरसाठी अट्टारीनजीक गुरुद्वारा सतलानी साहिबच्या असलेल्या २१ एकर शेतीतून भाजीपाला पुरवला जातो. मात्र, आता गुरुद्वारा प्रबंधक समितीने येथील शेतीवर नियंत्रण घेत स्वतःच शेती करण्याचा निर्णय घेतला असून या बदल्यात ते गुरुद्वारा सतलानी साहिबला याचा मोबदला देणार असल्याचे ‘एसजीपीसी’चे सचिव सुखदेवसिंग भुरा यांनी सांगितले.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

एसजीपीसीचे सचिव सुखदेवसिंग भूरा यांनी या विषयी बोलताना सांगितले, की गुरुद्वारा सतलानी साहिबच्या २१ एकर जमिनीवरील सात एकर जमिनीवर २०१५ पासून सेंद्रीय शेती करण्यात येते. या जमिनीवर उत्पादन केलेला भाजीपाला लंगरसाठी वापरला जात होता. आता सुवर्ण मंदिर प्रशासनाने या जमिनीवर स्वतः शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या सर्व २१ एकर जमिनीवर सेंद्रीय शेती करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com