'चिमणीने अंडी दिली, अन् तितक्यात बुलडोझर आला', आनंद महिंद्रांची पोस्ट चर्चेत | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Mahindra shared a viral video

Video: 'चिमणीने अंडी दिली, अन् तितक्यात बुलडोझर आला', आनंद महिंद्रांची पोस्ट चर्चेत

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते सातत्याने अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. कधी त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे असतात तर कधी प्रेरणा देणारे. नुकताच त्यांनी असाच प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केलाय ज्यात एक चिमणी अंडी देते आणि त्याच दरम्यान एक बुलडोझर तेथे येतो आणि पुढे जे काही होते, ते पाहून अंगावर काटा येतो.

हेही वाचा: महिला आढळली शेजाऱ्याच्या घरात; नवरा आणि गावकऱ्यांकडून मारहाण

व्हिडीओ मध्ये एक चिमणी मोकळ्या मातीच्या ढिगारावर अंडी देते मात्र अचानक त्या मातीच्या ढिगाऱ्यावर बुलडोझर येतो. मात्र ती चिमणी न घाबरता तिथेच तटस्थ उभी राहते आणि अंडी आपल्या पंखाच्या खालीस पिल्लांचे संरक्षण करते. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ती ज्या धीटपणे सामना करणे, ते खरचं कौतुकास्पद आहे. या व्हिडीओला आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन दिले, “माँ तुझे सलाम”

हेही वाचा: 'लैंगिक संबंध नाकारणे' हे घटस्फोटासाठी कारण होऊ शकत नाही: दिल्ली उच्च न्यायालय

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखांहून अधिक व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहे.

Web Title: Anand Mahindra Shared A Viral Video How Sparrow Protect Her Eggs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..