तो मी नव्हेच..; कथित अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतर खासदाराचे वक्तव्य

Obscene photo
Obscene photo

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील एका खासदाराच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत त्या खासदाराने मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.

नुकतेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक पुरुष व्हिडिओ कॉलद्वारे एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने शर्ट घातलेला नाहीये आणि तो व्हिडिओ कॉलवर एका महिलेला त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवत आहे. मात्र, जिममध्ये शर्टलेस वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ अश्लील व्हिडिओत रूपांतरित केल्याचा दावा खासदारांनी केला आहे.

Obscene photo
OnePlus चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, किंमत १६ हजारांहून कमी

वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार गोरंतला माधव यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे. माधव म्हणाले की, बनावट व्हिडिओ हा विरोधी तेलुगु देसम पार्टी किंवा टीडीपीमधील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या राजकीय कटाचा परिणाम आहे.

आंध्र प्रदेशचे खासदार माधव यांनी सांगितले की, त्यांनी आधीच पोलिस आणि सायबर क्राईम युनिटकडे तक्रार केली आहे. राजकारणात येण्यापूर्वी माधव स्वतः माजी पोलीस अधिकारी आहेत. माधव यांन सांगितले की, त्यांना टारगेट करण्यात आले कारण ते मागासवर्गीय जातीचे आहेत आणि कठोर परिश्रम घेत पुढे आले आहेत. उच्चवर्णीयांशी संबंधित ‘यलो मीडिया’ आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप त्यांनी केला, गरज पडली तर ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Obscene photo
संजय पांडेंचा मुक्काम कोठडीतच; जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com