अनिल अंबानींवर कर्जाचा डोंगर वाढताच, फायद्यातील कंपन्या काढल्या विकायला

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 3 November 2020

कर्जबाजारी झालेले भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे.

नवी दिल्ली: कर्जबाजारी झालेले भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. यामुळे अनिल अंबानी यांनी आता रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि रिलायन्स निपो लाइफ इन्शुरन्स या सहाय्यक कंपन्या विकण्यासाठी निविदा मागवण्यात केल्या आहेत.

अनिल अंबानी यांना या व्यवहारातून 20 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबरला या कंपन्यांना एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनिल अंबानी हे या कंपन्या विकून रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे भागवण्याच्या प्रयत्नात आहेत. 

रिलायन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांनी घट

अनिल अंबानी यांनी ज्या कंपन्यांना विक्रीसाठी आमंत्रित केले आहे, त्या कंपन्यांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स फायनान्शियल लिमिटेड आणि रिलायन्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स कॅपिटल लिमिटेडमध्ये 93 टक्के हिस्सा असलेल्या ट्रस्टी विस्ट्रा ITCL इंडिया लिमिटेडच्या वतीने ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

रिलायन्स कॅपिटलने आपली उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला 252 कोटी रुपये घेऊन बाहेर पडण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीलाही बाहेर पडण्यास सांगितले आहे. जपानची विमा कंपनी निप्पॉन लाइफच्या (Nippon Life) संयुक्त उपक्रमात चालणाऱ्या रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स (Reliance Nippon Life Insurance Company) कंपनीचे एकूण पेड-अप भांडवल सुमारे 1196 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

मोदी सरकार आणि सामान्यांसाठी खूशखबर, देशाच्या अर्थचक्राला येतेय गती

अनिल अंबानी यांची रिलायन्स समूह कंपनीने रिलायन्स कॅपिटल लिमिटेडला जुलै महिन्यातच दिलेल्या शेअर बाजारातील अहवाल सांगितले होते की, जून तिमाहीत कंपनीला मोठे नुकसान झाले होते. कंपनीच्या वतीने माहिती दिल्यानंतर रिलायन्स समूहाच्या वतीने आपल्या काही कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा अंदाज सुरुवातीलाच व्यक्त केला जात होता.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Ambani debt mountain grows two sub companies to sell