Vidhan Parishad MLA: विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीला मिळेना मुहुर्त; सुनावणी पुन्हा ढकलली पुढं

उद्या ४ जुलै रोजी ही सुनावणी पार पडणार होती.
Vidhan Parishad
Vidhan ParishadSakal

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी अद्यापही मुहुर्त मिळत नसल्याचं चित्र आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या, ४ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. (Appointment of 12 MLAs of Vidhan Parishad case again postpone to hearing in Supreme Court)

Vidhan Parishad
Union Cabinet Meeting: पावसाळी अधिवेशन जुन्या संसदेतच ते मिशन 2047; कॅबिनेट बैठकीत झाली 'या' विषयांवर चर्चा

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती प्रकरणाची केस अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळं या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. ठाकरे सरकारने राज्यपालांना १२ आमदारांची यादी दिली होती. पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही यादी मंजूर केली नव्हती. (Latest Marathi News)

Vidhan Parishad
NCP Crisis: दिल्लीतल्या बड्या नेत्याची शरद पवारांकडून हाकालपट्टी; 'या' नव्या नेत्याची केली नियुक्ती

दरम्यान, सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठविली होती, पण अगोदरची यादी बदलण्यात आली होती. याचिकाकर्ते सुनिल मोदी यांनी सुप्रीम कोर्टात या नियुक्त्यांना आव्हान दिलं आहे, यावर उद्या सुनावणी होणार होती. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com