Video : व्यायाम करत नसाल, तर हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

Health tips
Health tips

पुणे : करिअरच्या मागे धावताना आज माणूस स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरून गेलाय. व्यायाम करा, चालायला लागा, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याशिवाय कोणी काहीच करताना दिसत नाही. मुळात जेव्हा हा सल्ला दिला जातो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. या विषयावर डोळ्यांत अंजन घालणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तुम्हाला व्यायामाची आवड आहे की गरज?
व्यायामाची आवड असणं आणि त्याची गरज निर्माण होणं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्याला व्यायामाची आवड असेल, तर त्याला आयुष्यात त्याची गरज भासत नाही आणि ही आवड जोपासली नाही, तर एक दिवस त्याची गरज नक्की भासते.

सध्या मेट्रो सिटीमध्ये व्यायाम करण्यासाठी जीमला जावं लागतं. बाकी सगळ्या गोष्टी बसल्या जागी होतात. लाईट बिल, मोबाईल बिल, हे सोडाचं जेवणही ऑनलाईन मागवलं जातं. परिणामी, माणसाच्या शरीराची हालचालच थांबली आहे.

दिवसभर एसीमध्ये काम करणं, एसी कारमधून घरी जाणं आणि पुन्हा एसीची हवा खात झोपी जाणं, यात शरीरातून घाम बाहेर पडण्याची प्रक्रियाच जणू थांबली आहे. मग हा घाम गाळण्यासाठी पुन्हा जीमचा आधार घ्यावा लागतो. या परिस्थितीवर कितीही लिहिलं तरी लोकांच्या पचनी पडत नाही. पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने अनेकांचे डोळे उघडले आहेत. 

तुम्हाला कसं जगायचंय?
सध्या सोशल मीडियावर लाईफ स्टाईलमध्ये कोण कोणते बदल करावेत, जेणेकरून तुम्ही फिट राहाल तुमचा आहार कसा असावा, तुम्ही फ्रेश कसे राहाल, पोटाचा घेर, पोटाची चरबी कशी कमी कराल, आशा स्वरुपाचा कंटेंट मोठ्या प्रमाणावर दिसतो. अनेकजण तो कंटेंट वाचतात. शेअर ही करतात, पण फॉलो कोण करतात? हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येकाने याचा विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला श्रीमंत आयुष्य जगायचंय की, निरोगी आयुष्य? हा निर्णय तुमचा असणार आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस स्वत:कडे आणि आरोग्याकडे लक्ष देण्यात कमी पडत आहे. निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचं महत्त्व आपण जाणताच. मात्र, दररोज व्यायाम करणे आजही अनेकांच्या दिनचर्येत येत नाही. त्याचे दुष्परिणाम काय आहेत, याचा आपण गांर्भियाने विचार करत नाही. तुम्हीही व्यायाम करत नसाल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com