Arvind Kejriwal : ''पुढचे पंतप्रधान मोदी नव्हे तर अमित शाह'' केजरीवालांचं मोठं विधान; कारणही सांगितलं

Arvind Kejriwal
Arvind Kejriwalesakal

Arvind Kejriwal on PM Modi and Amit Shah : तिहार जेलमधून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी जाहीर सभेला संबोधित केलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केलं आहे. यावेळी त्यांनी देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, भाजपचे लोक इंडिया आघाडीला विचारीत आहेत की तुमचा पंतप्रधान कोण आहे? परंतु मी सांगतो की, खुद्द मोदी हे पुढचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. ते अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत.

याचा खुलासा करताना केजरीवाल म्हणाले, पंतप्रधान मोदी पुढच्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. खुद्द मोदींचा नियम आहे की ७५ वर्षांच्या नेत्यांना रिटायर केलं जाईल. त्यामुळे पुढचा पंतप्रधान अमित शाह हेच असतील.

Arvind Kejriwal
Nitesh Rane: हिंदू राष्ट्रासाठी भाजपला निवडून द्या, नितेश राणे यांचे नालासोपारा येथे आवाहन

केजरीवाल पुढे बोलले की, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना त्यांच्या वाढत्या वयामुळे निवृत्ती दिली होती. आता खुद्द नरेंद्र मोदी हेसुद्धा ७५ वर्षांचे होत आहेत. आता मी भाजपला विचारतो की, तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? मुळात मोदी हे स्वतःसाठी नव्हे तर अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत.

Arvind Kejriwal
Jalgaon Lok Sabha: रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटलांच्या भेटीला! अक्षयतृतीयेचा मुहूर्त फळाला; पाटील होणार प्रचारात सक्रिय

''तुम्ही जर भाजपला मत देण्यासाठी जाणार असाल तर लक्षात ठेवा की ते मत मोदींसाठी नव्हे तर अमित शाहांसाठी जाणार आहे. जर मोदींनी निवृत्ती घेतली तर त्यांची गॅरंटी कोण पूर्ण करणार?'' असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com