हातात पूर्ण सत्ता असती तर...- अरविंद केजरीवाल

वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

  • केजरीवाल यांची पुन्हा एकदा "पूर्ण राज्याची' मागणी

नवी दिल्ली : "प्रजासत्ताक देशात जनतेने निवडून दिलेल्यांच्या हातीच सत्ता असायला हवी. त्यामुळेच दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, अशी सर्व नागरिकांची आणि आम आदमी पक्षाची इच्छा आहे,' अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, दिल्लीत प्रचाराला आणि आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, "आम्ही काहीच काम केले नाही, गेल्या वर्षातच कामे केली, असा आमच्यावर आरोप होतो आहे. मात्र, आमच्या सर्व फायली नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी जाऊन तिथेच अडकून पडतात. आम्हाला जनतेने निवडून दिले असल्याने सत्ता आमच्याकडे हवी. हे केवळ दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यावरच शक्‍य आहे.

ब्रेकिंग : सोने-चांदीच्या भावात घसरण; पाहा आजचे भाव 

''दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा करण्याचा मुद्दा "आप'च्या जाहीरनाम्यात आहे. भाजपने दिल्लीला "देशाची कचऱ्याची राजधानी बनविले असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, जेएनयूमधील हिंसाचाराविरोधात आणि युवकांची दिशाभूल होत असल्याविरोधात भाजप नेते मनोज तिवारी यांनी आज शहरात दुचाकी रॅली काढली.

मध्यमवर्गीयांना बजेट बिघडणार; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

दोष पोलिसांचा नव्हे
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात दिल्लीचे पोलिस सक्षम आहेत, मात्र त्यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशच मिळाले होते, असा आरोप करत केजरीवाल यांनी केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य केले. जेएनयूमधील हिंसाचारावेळी पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप होत असल्याचा संदर्भ त्यांच्या टीकेला होता.

"तुमसे ना हो पाएगा'
दिल्लीत भाजप सत्तेवर आल्यास जनतेला दसपट अधिक फायदे देऊ, या भाजप नेते मनोज तिवारी यांच्या विधानाची "आप'ने खिल्ली उडविली आहे. चित्रपट पाहणाऱ्या आपल्या मुलाकडून राजकीय अपेक्षा नसलेला बाप त्याच्या मुलाला "बेटा, तुमसे ना हो पाएगा' असे म्हणत असल्याचा संवाद "गॅंग्ज ऑफ वासेपूर' या चित्रपटात आहे.

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

"आप'ने हरियानाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला अंधारात काम करत असल्याचे छायाचित्र ट्‌विटरवर प्रसिद्ध करत, आधी तुमचे सरकार असलेल्या राज्यात वीज आणून दाखवा, असे म्हणत तिवारींना "तुमसे ना हो पाएगा' असा टोला मारला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Kejriwal demands delhi independent state once again