केजरीवाल मान यांना दारू पुरवतात; अकाली दल प्रमुखांच्या विधानाने खळबळ

पंजाबचं सरकार केजरीवाल दिल्ली बसून चालवतात, असंही ते म्हणाले आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSakal

पंजाबचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हं दिसत आहेत. अकाली दलाच्या अध्यक्षांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. त्याच्या या विधानाने खळबळ माजली आहे. (Delhi CM Arvind Kejriwal sends box of liquor to Punjab CM Bhagwant Mann)

Arvind Kejriwal
पंजाब सरकारचे धडाधड निर्णय; आता 424 व्हीआयपींची 'सुरक्षा' घेतली काढून

दिल्लीतून दर आठवड्याला दारूचा बॉक्स भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांना पुरवला जातो. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग यांनी पंजाबमधलं सरकार दिल्लीतून अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) चालवतायत, असा आरोपही केला आहे. सुखबीर सिंग म्हणाले, "केजरीवाल हे प्रत्येक आठवड्याला भगवंत मान यांना दारुचा बॉक्स पाठवतात आणि त्यांना म्हणतात की सरकारी ऑफिसमध्ये बसा आणि मजा करा आणि ते स्वतः पंजाबमधलं सरकार चालवतात."

Arvind Kejriwal
'हरिजन शब्दाऐवजी डॉ. आंबेडकर म्हणा'; केजरीवाल सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi Singer Siddhu Moose wala) याच्या मृत्यूला आप सरकार जबाबदार असल्याचा आरोपही सुखबीर सिंग यांनी केला होता. सिद्धूची सुरक्षा काढून घेऊन सरकारने त्याच्या शत्रूंनी सावध केलं. म्हणून तो मेला, असं सिंग म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com