Asani Cyclone Updates: मुसळधार पाऊस, चेन्नई विमानतळावरून मुंबईसह १० विमाने रद्द

Asani Cyclone Updates
Asani Cyclone Updatesesakal

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील असनी वादळाचे (Asani Cyclone) तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. मात्र, त्याचा परिणाम देशातील मोजक्याच राज्यांमध्ये दिसून येत आहे. असनी मंगळवारी रात्री उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचल्यावर चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेशात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. तसेच चेन्नई विमानतळावरून (Chennai Airport) १० विमाने रद्द करण्यात आली आहेत. (Asani Cyclone Updates)

Asani Cyclone Updates
असनी चक्रीवादळाचा प्रभाव; मॉन्सूनसाठी करावी लागणार प्रतीक्षा

सध्या असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागराचा पश्चिम-मध्य भाग आणि पश्चिम दक्षिण भागात आहे. विशाखापट्टणमपासून दक्षिणेला ३०० किलोमीटरवर आहेत. त्यामुळेच आंध्रप्रदेशात जोरदार पाऊस कोसळत आहे. हे वादळ आज रात्रीपर्यंत उत्तर-पश्चिम दिशेला सरकून ओडिशाच्या किनारपट्टीला धडकेल, असं विशाखापट्टणम हवामान विभागाचे अधिकार कुमार यांनी सांगितलं.

चक्रीवादळामुळे १० विमाने रद्द -

चक्रीवादळामुळे वातावरणात बिघाड झाला आहे. जोरदार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे चेन्नई विमानतळावरून उडणारी १० विमाने रद्द करण्यात आली आहे. यामध्ये हैदराबाद, विशाखापट्टणम, मुंबईसह जयपूरचा समावेश आहे.

वादळामुळे जोरदार पाऊस -

चक्रीवादळामुळे सोमवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस झाला. चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मंगळवारी संध्याकाळपासून किनारपट्टी ओडिशाच्या लगतच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की पश्चिम-मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरावर वादळ तीव्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून किमान पुढील दोन दिवस या भागात न जाण्याचा सल्ला मच्छिमारांना देण्यात आला आहे. 13 मे पर्यंत किनारपट्टी भागातील पर्यटन उपक्रम स्थगित करण्याची सूचनाही विभागाने केली आहे. 12 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पुढील 4 दिवसांत पावसाचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com