esakal | सोनोवाल, नड्डा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

गुवाहाटी - आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना सोमवारी प्रचारफेरीदरम्यान रंग लावताना नागरिक.

बातमीच्या स्वरूपात जाहिरात छापल्याप्रकरणी काँग्रेसच्या तक्रारीनंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पाच वर्तमानपत्रांविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला.

सोनोवाल, नड्डा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण

sakal_logo
By
पीटीआय

गुवाहाटी - बातमीच्या स्वरूपात जाहिरात छापल्याप्रकरणी काँग्रेसच्या तक्रारीनंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पाच वर्तमानपत्रांविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजीतकुमार दास यांच्यावरही कारवाई करण्यात आली. पहिल्या टप्प्यात २७ मार्च रोजी मतदान होणाऱ्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास या जाहिरातीत व्यक्त करण्यात आला होता. त्यावरून आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खडसे यांच्याकडे प्रदेश काँग्रेसने, तर अखिल भारतीय काँग्रेस समितीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर रविवारी रात्री दिसपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

शेतकऱ्यांची हटके होळी; रंगांऐवजी माती लावून एकमेकांना दिल्या शुभेच्छा

आसाम प्रदेश काँग्रेस समितीच्या कायदा शाखेचे अध्यक्ष निरन बोरा यांनी याबाबत सांगितले की, निवडणुकीतील पराभव अटळ असल्याचे कळून चुकल्यामुळे भाजप नेते आणि सदस्यांनी अशा बेकायदा आणि घटनाबाह्य मार्गांचा अवलंब केला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदारांची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचा हा पूर्वनियोजित कट आहे. त्यासाठीच विविध वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिराती देण्यात आल्या आहेत. यामुळे १९५१च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या १२६ अ कलमाचा भंग झाला आहे. त्यासाठी दोन वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.

"महाराष्ट्रात सर्वांसाठी लसीकरण सुरु करा"; आनंद महिंद्रांची पंतप्रधानांना विनंती

निवडणूक आयोगाने आसामच्या बाबतीत खास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मतदानाच्या निकालावरून अंदाज वर्तविणारी कोणत्याही स्वरुपातील माहिती २७ मार्च रोजी सकाळी सात ते २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात दरम्यान प्रसिद्ध करण्यास मनाई आहे. या सूचनेचे उल्लंघन झाल्यामुळे तक्रारीत नावे असलेल्यांविरुद्ध पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असे आवाहन आसाम काँग्रेसने केले आहे.

चार भाषांतील वर्तमानपत्रे
पोलिसांनी इंग्रजी, आसामी, हिंदी आणि बंगाली अशा चार भाषांतील आठ प्रमुख वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दी आसाम ट्रिब्यून, असोमिया प्रतिदिन, अमर असोम, नियोमिया बार्ता, असोमिया खबोर, दैनिक असम, दैनिक जुगासंखा आणि दैनिक पूर्वोदया अशी या दैनिकांची नावे आहेत.

Edited By - Prashant Patil

loading image