Pregnant Women: 'या' तारखेलाच प्रसूती करा! युपीमधील गर्भवती महिलांची डॉक्टरांना विनंती; काय आहे कारण?

गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रभारी सीमा द्विवेदी यांनी सांगितले की, त्यांना एका लेबर रूममध्ये 12 ते 14 सिझेरियन प्रसूतीसाठी लेखी विनंत्या मिळाल्या आहेत.
Pregnant Women
Pregnant WomenEsakal

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील अनेक गर्भवती महिलांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार असताना सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना सिझेरियन प्रसूती करण्याची विनंती केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा एका शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. हे पाहता ज्यांची प्रसूती त्याच दिवशी होणार आहे अशा अनेक गरोदर महिलांना त्याच दिवशी मूल जन्माला यावे अशा इच्छा व्यक्त केली आहे. अनेक गरोदर महिलांनी सिझेरियन प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडे विनंती केली आहे.

गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रभारी सीमा द्विवेदी यांनी सांगितले की, त्यांना एका लेबर रूममध्ये 12 ते 14 सिझेरियन प्रसूतीसाठी लेखी विनंत्या मिळाल्या आहेत. तर 22 जानेवारी रोजी 35 सिझेरियन ऑपरेशनची व्यवस्था केली जात आहे.

गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांना विनंती केली आहे की, त्यांची प्रसूतीची तारीख 22 जानेवारीच्या आधी किंवा नंतर काही दिवस असली तरीही, शुभ दिवस मानून त्यांना त्या दिवशीच आपल्या बाळाला जन्म द्यायचा आहे. द्विवेदी यांनी पुढे सांगितले की, गरोदर माता पुजाऱ्यांकडून अनेकदा शुभ तारीख आणि वेळ शोधतात आणि त्या दिवशी प्रसूतीची विनंती करतात.

Pregnant Women
Budget 2024: शेतकऱ्यांसाठी सरकार करणार मोठी घोषणा; पीएम किसान योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता

पुढे त्यांनी नियोजित वेळ आणि तारखेला बाळंतपणाचे विविध अनुभव सांगितले. कारण पुजाऱ्यांनी दिलेल्या 'मुहूर्तावर' (शुभ मुहूर्तावर) प्रसूतीचा आग्रह माता आणि कुटुंबीयांनी धरला. ही चिंताजनक बाब आहे. काही वेळा कुटुंबातील सदस्यांनी आई आणि मुलासाठी उद्भवणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा असते.

श्री राम हे शौर्य, साहस आणि आज्ञाधारकतेचे प्रतीक आहेत, अशी मातांची श्रद्धा आहे, त्यामुळे मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मलेल्या मुलांमध्येही तेच गुण असतील, अशी अनेक महिलांची समजूत आहे.

Pregnant Women
Rajasthan Election: आमदार होण्यापुर्वी मिळालं मंत्रिपद अन् ...काँग्रेसने केला पोटनिवडणुकीत पराभव!

मालती देवी (वय 26) कल्याणपूर येथील रहिवासी, जिची प्रसूतीची तारीख 17 जानेवारी आहे, त्या गर्भवती मातांपैकी एक आहेत ज्यांनी कानपूर रुग्णालयाच्या डॉक्टरांना २२ जानेवारीला प्रसुती व्हावी ही विनंती केली आहे. पीटीआयशी बोलताना तिने सांगितले की, राम मंदिरातील राम लालाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच आपले मूल जन्माला यावे अशी तिची इच्छा आहे. त्याचबरोबर पुढे मालती देवी म्हणाली, मला आशा आहे की माझे मूल मोठे होईल, तेव्हा ते यश आणि वैभव प्राप्त करेल.

मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात?

मानसशास्त्रज्ञ दिव्या गुप्ता यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या मुलाचा जन्म एखाद्या शुभ मुहूर्तावर झाला तर त्याचा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो. कधीकधी धर्म आणि अध्यात्म माणसाला जीवनातील ताणतणावांना सामोरे जाण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची ताकद देतात.

Pregnant Women
Pune Loksabha ByElection: पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही! हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं दिली स्थगिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com