Rajasthan Election: आमदार होण्यापुर्वी मिळालं मंत्रिपद अन् ...काँग्रेसने केला पोटनिवडणुकीत पराभव!

Rajasthan Election: राजस्थानमध्ये एका विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे. महत्वाचं म्हणजे भाजपकडून जो उमेदवार दिला होता त्याला सरकारने मंत्री केलं होतं.
Rajasthan Election
Rajasthan ElectionEsakal

राजस्थानमध्ये एका विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे. महत्वाचं म्हणजे भाजपकडून जो उमेदवार दिला होता त्याला सरकारने मंत्री केलं होतं. त्याच मंत्र्याचा या पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह कुन्नर यांचा विजय झाला आहे.

राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यातील करणपूर विधानसभा जागेसाठी सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीवेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

राजस्थानमधील विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. 3 डिसेंबर रोजी त्याचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) 115 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. करणपूर गंगानगर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ती पार पडली असून ती जागा काँग्रेसने जिंकली आहे.

राजस्थानमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर आला आहे. तर काँग्रेस बहुमताच्या जादुई आकड्यापासून दूर आहे. अशा स्थितीत करणपूरची जागा जिंकून किंवा हरल्याचा फायदा भाजप किंवा काँग्रेसला होणार नाही हे स्पष्ट आहे, पण तरीही ही जागा प्रतिष्ठेची झाली होती.

Rajasthan Election
Bilkis Bano Case: गुजरात सरकारनं सुटका केलेले सर्व 11 दोषी पुन्हा तुरुंगात जाणार; सुप्रीम कोर्टानं दिला अल्टिमेटम

या जागेसाठी एकूण 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एक अर्ज फेटाळण्यात आला. तर एक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. अशा परिस्थितीत आता 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये भाजपचे सुरेंद्र पाल सिंग टीटी, काँग्रेसचे रुपिंदर सिंग कुन्नर, बसपचे अशोक कुमार, आम आदमी पार्टीचे प्रितीपाल सिंग, राष्ट्रीय जनमंडल पक्षाचे कृष्ण कुमार, शिरोमणी अकाली दलाचे बलकरण सिंग यांच्यासह अपक्ष उमेदवार म्हणून कला सिंग, चुकी देवी, छिंदरपाल सिंग आणि तितर यांचा समावेश आहे. सिंग हेही उमेदवार होते.

Rajasthan Election
Ola Electric: ओला इलेक्ट्रिक देणार 25,000 लोकांना नोकऱ्या; 2,000 एकरवर मेगा फॅक्टरी उभारणार

आमदार होण्यापूर्वीच मिळाली 4 खाती

राजस्थानच्या इतिहासात भाजपने निवडणूक लढवण्यापूर्वीच उमेदवाराला मंत्री बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच दरम्यान भाजपने ५ जानेवारीला मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये श्री करनपूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुरेंद्रपाल सिंह टीटी यांना स्वतंत्र प्रभार देऊन राज्यमंत्री करण्यात आले. याअंतर्गत त्यांना चार विभाग देण्यात आले आहेत. यामध्ये कृषी पणन विभाग, कृषी संचय विभाग व जलउपयोग विभाग, इंदिरा गांधी कालवा, अल्पसंख्याक कार्य व वक्फ बोर्ड यांना देण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com