
आझम खान तुरुंगातच; उच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा सुनावणी
आझम खान यांच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयात या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रकरणावर गुरुवारी (ता. ५) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारात उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी (High court-hearing on thursday) होणार आहे. यामुळे जवळपास २६ महिने तुरुंगात असलेले आझम खान (Azam Khan) पुन्हा एकदा निराश झाले आहेत. (Azam Khan in jail)
आझम खान (Azam Khan) यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात आझम खान यांच्या जामिनावर लवकर निर्णय घेण्यासाठी अर्ज केला होता. ज्यावर दोन मे रोजी सुनावणी होऊ शकली नाही. यावेळी आझम खान यांची ईदही तुरुंगातच गेली. आझम खानच्या वकिलाने सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन याचिकेवर आदेश दिल्यानंतर बराच काळ निर्णय प्रलंबित ठेवला आहे.
हेही वाचा: उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू; डॉक्टरांनी तासभर केला मृतदेहावर उपचार
गेल्यावर्षी ४ डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. आझम खान यांच्यावर एकूण ७२ गुन्हे दाखल आहेत. यापैकी ७१ प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे. केवळ शत्रू संपत्ती प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला नाही.
२०१९ मध्ये त्यांच्याविरुद्ध अझीमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आझम खान (Azam Khan) यांच्यावर शत्रूची मालमत्ता हस्तगत करून जौहर विद्यापीठात विलीन केल्याचा आरोप होता. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपपत्रही दाखल केले होते.
हेही वाचा: चार धाम यात्रा : यमुनोत्रीमध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू; ऑक्सिजनची कमी
राज्य सरकारने मागितला वेळ
याप्रकरणी राज्य सरकारने आणखी काही तथ्ये मांडण्यासाठी वेळ मागणारा अर्ज केला होता. त्यावर सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने ४ मे ही तारीख दिली होती. या तारखेला राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले. गुरुवारी पुन्हा या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Web Title: Azam Khan In Jail High Court Hearing On Thursday Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..