
उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू; डॉक्टरांनी तासभर केला मृतदेहावर उपचार
मध्य प्रदेशातील खंडवा येथील महिला रुग्णालयात गर्भवतीचा (Pregnant) संशयास्पद मृत्यू झाला. गर्भवतीला प्रसूती वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तीव्र प्रसूती वेदना होऊनही डॉक्टर व परिचारिका रुग्णालयात उपचारासाठी आले नाही. उलट स्टाफ परिचारिका मोबाईलवर गेम खेळत होती. यातच महिलेचा वेदनेमुळे मृत्यू (death) झाला. फरहीन असे मृत महिलेचे नाव आहे. (Pregnant woman dies due to lack of treatment)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती फरहीन हिला प्रसूती वेदना होत असल्याने लेडी बटलर महिला रुग्णालय, खांडवा येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर ड्युटीवर असलेल्या परिचारिका आणि डॉक्टरांनी तब्बल तासभर मृत महिलेवर उपचार करीत कुटुंबीयांना खोटे सांत्वन दिले. यामुळे कुटुंबीयांनी गोंधळ घातला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत केले.
हेही वाचा: चार धाम यात्रा : यमुनोत्रीमध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू; ऑक्सिजनची कमी
महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि परिचारिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. महिला डॉक्टर आणि स्टाफ परिचारिका झोपले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. फरहीनची प्रकृती बिघडली की, ती जेव्हाही डॉक्टरला बोलायला जायची तेव्हा तिला शिवीगाळ करून हाकलून देत असे. तर स्टाफ परिचारिका मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होती.
स्टाफ परिचारिका गेम खेळण्यात मग्न
मंगळवारी दुपारी फरहीनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होईल असे सांगितले. परंतु, रात्री फरहीनला प्रसूती वेदना होऊ लागल्या तेव्हा डॉक्टर आणि परिचारिकेला फोन केला. मात्र, त्यांचे ऐकले नाही. उलट स्टाफ परिचारिका मोबाईलमध्ये गेम खेळण्यात मग्न होती, असे मृत महिलेची सासू फरीद यांनी सांगितले.
हेही वाचा: राणादा अन् अंजलीबाईचं जमलं! साखरपुड्याचे फोटो व्हायरल
कठोर कारवाईची मागणी
फरहीनचा (Pregnant) मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी तासभर उपचार करण्याचे नाटक केले. फरहीन अजूनही श्वास घेत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. तसेच अनेक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. मात्र, फरहीनचा आधीच मृत्यू (death) झाला होता. डॉक्टर आणि परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप फरहीनच्या कुटुंबीयांनी केला आहे. रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Web Title: Pregnant Woman Dies Due To Lack Of Treatment Crime News Madhya Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..