esakal | ठरलं! कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलाचा 26 जुलैला फैसला; खुद्द येडियुराप्पांनीच दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka CM BS Yediyurappa

कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Karnataka CM BS Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

ठरलं! कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलाचा 26 जुलैला फैसला

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

बंगळूर : कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Karnataka CM BS Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी लिंगायत मठांच्या प्रमुखांना आपल्या पाठीशी उभे केले आहे. मुख्यमंत्र्यांना हटवल्यास राज्यातील लिंगायत समाजात असंतोष निर्माण होईल, असा दबाव त्यांनी पक्ष नेतृत्वावर आणण्यास सुरवात केलीय. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या (BJP) नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली, असली तरी आज खुद्द येडियुरप्पांनीच मुख्यमंत्री बदलाबाबत एका ट्विटव्दारे माहिती दिलीय. (B. S. Yediyurappa Said The Decision To Change The Karnataka Chief Minister Would Be Taken On July 26 Karnataka Political News)

येडियुरप्पा यांना यासाठी दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. राज्यात परतल्यानंतर येडियुरप्पांनी लिंगायत कार्ड खेळले आहे. राज्यातील लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून येडियुरप्पांना पाहिले जाते. पक्षीय भिंती ओलांडूनही अनेक पक्षांतील नेते लिंगायत नेते म्हणून येडियुरप्पांना मान्यता देतात. येडियुरप्पांनी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सर्व मठाधिपतींनी येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नये, असा इशारा भाजप नेतृत्वाला दिला आहे.

हेही वाचा: कर्नाटक राज्याचा कोण होणार मुख्यमंत्री?

BS Yediyurappa

BS Yediyurappa

त्यातच आज खुद्द येडियुरप्पांनीच एका ट्विटव्दारे सांगितले, की अद्याप मला कोणाकडूनही राजीनामा देण्यास सांगण्यात आले नाही. जेव्हा मला राजीनामा देण्यास सांगितले जाईल अथवा तसे काही निर्देश येतील, तेव्हा मी माझ्या पदाचा नक्कीच राजीनामा देईन. कारण, मी पक्षासाठी काम करतो, त्यामुळे मला वरिष्ठांचा आदेश मान्य करावा लागेल. तसेच नव्या मुख्यमंत्रीपदाबाबत मी कोणत्याही नावाची शिफारस केलेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षाकडूनही अजूनतरी मला तसे कोणतेच निर्देश आले नसून हाय कमांडकडूनही तशा कोणत्याच सूचना मला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे 26 जुलैनंतर काय होईल, ते पाहूया, तो पर्यंत मीच मुख्यमंत्री असेन, असेही येडियुरप्पांनी ट्विटमध्ये स्पष्ट केलेय. सध्या कर्नाटकातील नव्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Venkatesh Joshi), डॉ. सी. एन. अश्वथनारायण (Dr. C. N. Ashwathnarayan), बोम्मरबेट्टू संतोष (Bommarabettu Laxmijanardhana Santhosh), उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांची नावे आघाडीवर आहेत.

B. S. Yediyurappa Said The Decision To Change The Karnataka Chief Minister Would Be Taken On July 26 Karnataka Political News

loading image