बांगलादेश युद्ध काळातील ऑस्टिनचा संचलनात भाग

Austin-Shearline
Austin-Shearline

कोलकता - पाकिस्तानच्या फुटीतून बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वीच्या काळात पूर्व पाकिस्तानचे सैन्य प्रमुख लेफ्टनंट जनरल नियाझी वापरीत असेलेली ऑस्टिन शीअरलाइन ही ऐतिहासिक मोटार सुमारे ५० वर्षांनंतर पुन्हा रस्त्यावर दिसणार आहे. प्रजासत्ताकदिनी कोलकत्यात होणाऱ्या संचलनात या मोटारीचे दर्शन होईल. 

भारत - पाकिस्तानमधील १९७१ च्या युद्धात भारताचे पूर्व विभागाचे लष्करी अधिकारी जनरल अरोरा यांच्या पुढे पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली त्यावेळी भारतीय लष्कराने ऑस्टिन जप्त केली. युद्धकाळात जप्त केलेल्या अनेक वस्तूंमध्ये या मोटारीचा आणि नियाझींच्या मर्सिडिसचाही समावेश होता. या दोन्ही मोटारी त्यावेळी कोलकत्याला आणून ‘फोर्ट विल्यम’मध्ये ठेवल्या होत्या. गेल्‍या महिन्यात या गाड्या किल्ल्याच्या संग्रहालयाजवळ ठेवल्या होत्या. या मोटारी पाहण्यासाठी भारतीय लष्‍कराने गेल्या वर्षी विजयदिनी मुक्ती जुध्धा (बांगलादेशचे स्वातंत्र्य युद्ध)चे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोलकत्याला आमंत्रित केले होते. 

पाकिस्तानी सैन्याकडून खरेदी 
ब्रिटनची निर्मिती असलेली ऑस्टिन आणि मर्सिडिस या अलिशान गाड्यांची खरेदी पाकिस्तानी सैन्याने केली होती. नियाझी यांची पसंती मर्सिडिसला होती, पण ते ऑस्टिनही चालवित असत, असे ‘विल्यम फोर्ट’च्या सूत्रांनी सांगितले. प्रजासत्ताकदिनी उद्या कोलकत्यात होणाऱ्या संचलनात ऑस्टिनच्या सहभागाने अनेकांच्या बांगलादेश युद्धाच्या आठवणी ताज्या होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com