दिल्लीत होणाऱ्या 'रायसिना डायलॉग'मधून बांगलादेश बाहेर; CAA चा परिणाम!

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 12 जानेवारी 2020

अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणारे सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यानंतर बांगलादेशने नाराजी व्यक्त करताना परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा आयत्या वेळी रद्द केला होता.​

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधणाऱ्या 'रायसिना डायलॉग 2020' या परिसंवादात बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार नसल्याचे कळते. याआधी नागरिकत्व विधेयकावरून तेथील परराष्ट्रमंत्र्यांनी भारत दौरा रद्द करून आपली नाराजी व्यक्त केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे 'रायसिना डायलॉग 2020' हा कार्यक्रम 14 ते 16 जानेवारीदरम्यान दिल्लीत होणार आहे.

- ...नाहीतर 'छपाक' बंद करावा लागेल; दिल्ली कोर्टाने निर्मात्यांना सुनावले!

यात जगभरातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून त्यात अमेरिका, रशिया, इराण, मोरोक्को, मालदीव, भूतान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, उझबेकिस्तान या देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे.

- ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; काय केले आवाहन?

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री शहरीयार आलम हेदेखील यात सहभागी होणार होते. मात्र, आता परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान शेख हसिना यांच्या समवेत ते अबुधाबी दौऱ्यावर जाणार असल्याने या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. 

- धक्कादायक! शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगार करताहेत सर्वाधिक आत्महत्या

दुसऱ्यांदा दौरा रद्द 

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील धार्मिक छळामुळे भारतात आश्रय घेतलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्‍चन अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणारे सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यानंतर बांगलादेशने नाराजी व्यक्त करताना परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा आयत्या वेळी रद्द केला होता. आता 'रायसिना डायलॉग'मध्ये सहभाग टाळून बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दुसऱ्यांदा भारत दौरा रद्द केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladeshi Minister cancels participation in Raisina Dialogue