...नाहीतर 'छपाक' बंद करावा लागेल; दिल्ली कोर्टाने निर्मात्यांना सुनावले!

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

छपाक सिनेमा बनणाऱ्या फॉक्‍स स्टुडियो या निर्माता संस्थेने या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

नवी दिल्ली : ऍसिड हल्ला पिडीता लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारीत 'छपाक' या सिनेमाच्या श्रेय नामावलीत आपला उल्लेख असावा, अशी मागणी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा भट यांनी केली होती. त्यांची ही मागणी योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच अपर्णा भट यांना श्रेय द्यायलाच हवे असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने फॉक्‍स स्टुडियोची याचिका फेटाळली असून पटियाला न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. 

- Happy birthday Rahul Dravid : टीम इंडियाची 'दीवार'!

छपाक हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अपर्णा भट्ट यांनी श्रेय नामावलीत आपला उल्लेख व्हावा, या मागणीसाठी निर्मात्यांच्या विरोधात पटियाला न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात, पटियाला न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना अपर्णा यांना चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे श्रेय देण्याचे आदेश दिले. यानंतर, छपाक सिनेमा बनणाऱ्या फॉक्‍स स्टुडियो या निर्माता संस्थेने या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

- 'या' दिग्गज क्रिकेटपटूची पत्नी पडद्यावर साकारणार झूलन गोस्वामी

मात्र, छपाकच्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटात अपर्णा भट्ट यांना श्रेय देण्याचे आदेश न्यायालयाने निर्मात्यांना दिले होते. त्यामुळे पटियाला न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चित्रपट निर्मात्यांना वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय द्यावे लागणार आहे.

आपल्या निकालात दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अपर्णा भट्ट यांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीपासून चित्रपटगृहांमध्ये सिनेमा दिसणार नाही. तर 17 जानेवारीपासून इतर ठिकाणी सिनेमावर बंदी घातली जाईल.

- साहित्याला जात,धर्म पंत नसतो : शरद पवारांच्या साहित्य संमेलनास शुभेच्छा

मी अनेक वर्षे लक्ष्मी अग्रवाल यांच्या बाजूने न्यायालयात खटला लढला आहे. तसेच चित्रपट तयार करताना स्क्रिप्ट तयार करण्यातही मदत केली होती. परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारचे श्रेय देण्यात आले नाही. तसेच 16 ते 19 डिसेंबर या कालावधीत मी मेघना गुलझार यांच्या संपर्कात होतो. चित्रपट प्रदर्शित होताना त्यांना श्रेय दिलं जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु चित्रपटाच्या प्रमिअरदरम्यान माला कोणत्याही प्रकारचे श्रेय दिले नाही. 
- अपर्णा भट्ट, लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi High Court restrains from releasing of Chhapaak without giving credit to lawyer Aparna Bhat