Bank Holidays in September 2023: सप्टेंबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! बँकेची कामं पटापट करून घ्या...RBI ने प्रसिद्ध केली सुट्ट्यांची यादी

बँकेच्या सुट्ट्यांची माहिती मात्र नक्कीच घ्या. नाहीतर तुम्ही घरातून बँकेत पोहोचाल आणि बँकेच्या दारावरचं कुलूप पाहूनच तुम्हाला परत घराकडे फिरावं लागेल.
Bank Holidays In 2023
Bank Holidays In 2023esakal

ऑगस्ट महिना आता संपत आला आहे. दोनच दिवसांत सप्टेंबर महिना सुरू होईल. या दिवसांमध्ये तुम्हाला जर काही बँकेची कामं करायची असतील, तर घराबाहेर पडण्यापूर्वी सप्टेंबर महिन्यातल्या बँकेच्या सुट्ट्यांची माहिती मात्र नक्कीच घ्या. नाहीतर तुम्ही घरातून बँकेत पोहोचाल आणि बँकेच्या दारावरचं कुलूप पाहूनच तुम्हाला परत घराकडे फिरावं लागेल.

रिझर्व बँकेने सप्टेंबर महिन्यातल्या बँक हॉलिडेची यादी जाहीर केली आहे. यानुसार, सप्टेंबरमध्ये १६ दिवस बँकेचं कामकाज बंद राहणार आहे.

RBI ने जाहीर केली यादी

रिझर्व बँक दर महिन्यामध्ये बँक हॉलिडेची यादी आपल्या वेबसाईटवर अपलोड करते. सप्टेंबरमधल्या सुट्ट्यांची यादी रिझर्व बँकेने हा महिना सुरू होण्याच्या काही दिवस आधीच जाहीर केली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण १६ बँक हॉलिडे आहेत. यामध्ये विविध राज्ये आणि शहरांमध्ये होणाऱ्या सणसमारंभांचा समावेश आहे. शिवाय रविवार आणि दुसरा - चौथा शनिवार, यांच्या सुट्ट्याही सामील आहेत. बँकांच्या सुट्ट्या या शहर राज्याप्रमाणे बदलू शकता, हे लक्षात घ्या.

Bank Holidays In 2023
Bank Loan Rates Hike: ग्राहकांना मोठा धक्का! आणखी एका बँकेने कर्ज केले महाग

गोकुळाष्टमी, गणपती अन् बरंच काही...

सप्टेंबरमधल्या सुट्ट्यांच्या यादीवर एक नजर टाकल्यास लक्षात येतं की या महिन्यामध्ये बरेच सणवार आहेत. त्यामुळे या सणावाराच्या दिवशी बँका बंद राहतील. सप्टेंबरमध्ये कृष्णजन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि ईद आहे. त्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी राहील अशी घोषणा रिझर्व बँकेने केली आहे. याशिवाय ९,१०,१७,२३ आणि १४ सप्टेंबर म्हणजे रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार असल्याने बँकांचं कामकाज बंद राहील.

सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे

  • ३ सप्टेंबर - रविवार

  • ६ सप्टेंबर - कृष्णजन्माष्टमी (भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पटना बँक बंद)

  • ७ सप्टेंबर - कृष्ण जन्माष्टमी (अहमदाबाद, चंदीगढ, डेहराडून, गंगटोक, तेलंगण, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर बँक बंद)

  • ९ सप्टेंबर - दुसरा शनिवार

  • १०, १७ सप्टेंबर - रविवार

  • १८ सप्टेंबर - विनायक चतुर्थी (बंगळुरू, तेलंगण बँक बंद)

  • १९ सप्टेंबर - गणेश चतुर्थी (अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी बँक बंद)

  • २० सप्टेंबर - गणेश चतुर्थी नुआखाई (कोची, भुवनेश्वर बँक बंद)

  • २२ सप्टेंबर - नारायण गुरू समाधी दिवस ( कोची, पणजी, त्रिवेंद्रममध्ये बँक बंद)

  • २३ सप्टेंबर - चौथा शनिवार

  • २४ सप्टेंबर - रविवार

  • २५ सप्टेंबर - श्रीमंत शंकरदेव जयंती (गुवाहाटी बँक बंद)

  • २७ सप्टेंबर - मिलाद - ए - शरीफ (जम्मू, कोची, श्रीनगर, त्रिवेंद्रममध्ये बँक बंद)

  • २८ सप्टेंबर - ईद - ए - मिलाद - उन - नबी (अहमदाबाद, आईजोल, बेलापूर, बंगळुरू. भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगण, इम्फाळ, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची बँक बंद)

  • २९ सप्टेंबर - ईद - ए- मिलाद - उन - नबी (गंगटोक, जम्मू, श्रीनगरमध्ये बँक बंद)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com