Barsu Sculpture : उद्धव ठाकरेंच्या बारसू भेटीनंतर चर्चेत आलेली कातळशिप्ले म्हणजे काय?

कातळशिल्पे म्हणजे नक्की काय हे अनेकांना आजही माहिती नाही. तेव्हा याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
Barsu Sculpture
Barsu Sculptureesakal

Barsu Sculpture : उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बारसू येथे भेट दिली. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा कोकण दौरा होता. कोकणातील बारसू कातळशिल्पांना भेट दिल्यानंतर बारसू कातळशिल्पांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तसेच बारसू कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी उद्धव ठाकरे यांनी यूनेस्कोला पत्र देखील लिहीले आहे. मात्र कातळशिल्पे म्हणजे नक्की काय हे अनेकांना आजही माहिती नाही. तेव्हा याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

कातळशिल्प म्हणजे काय?

प्राग - ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व विशेष आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. मात्र विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे गूढ आहेत.

बारसू कातळशिल्प वादग्रस्त रिफायनरीत येत असल्याने नुकतेच उद्धव ठाकरे यांना कळले. मात्र असे असले तरी मी ही कातळशिल्प वादग्रस्त रिफायनरीत जाऊ देणार नाही असे वक्तव्य त्यांनी केलेय. या विषयावर ते तज्ज्ञांशी देखील बोलले. आणि बारसू कातळशिल्पाच्या बचावासाठी यूनेस्कोला त्यांनी पत्र देखील लिहीले आहे.

Barsu Sculpture
Barsu Refinery : 'कोकणाची वाट लावू नका'; बारसू रिफायनरी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, मुख्यमंत्र्यांना केलं आवाहन

९ जानेवारी २०१७ मध्ये बारसू रावारीत आढळली 67 कातळशिल्पे आढळली होती. कातळखोद शिल्पांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रचना रावारी व बारसू गावच्या सड्यावर आढळल्या होत्या. शोधमोहीमनंतर 67 ठिकाणी नवीन कातळशिल्पे सापडली. यातील एक मोठी रचना इजिप्तमधील रचनेशी मिळतीजुळती आहे. साऱ्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत. या राष्ट्रीय संपत्तीचे जतन गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने हा बहुमोल खजिना असून एकत्रित प्रयत्न झाल्यास अल्पावधीत कोकण आंतरराष्ट्रीय पर्यटनात अग्रेसर होईल. (Barsu Refinary Project)

Barsu Sculpture
Barsu Refinery : बारसु रिफायनरी वाद पेटला; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी

बारसू कातळशिल्पाची वैशिष्ट्ये

कोकणात आढळून येणाऱ्या कातळखोदशिल्पांची शैली भारतात अन्यत्र आढळणाऱ्या रचनेपेक्षा भिन्न आहे. भारताबाहेर पोर्तुगाल, इजिप्त, ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या अशा प्रकारच्या रचनांची शैली व कोकणातील शैलीत साधर्म्य आढळले आहे. बारसूच्या सड्यावर आढळून आलेली सुमारे 57 फूट लांबीची शिल्परचना अशा प्रकारच्या शैलीतील भारतातील सर्वात मोठी शिल्परचना असल्याचे दिसून आले आहे. निवळी, भडे इतर 8 ठिकाणी आढळलेले चौकोनी आकाराच्या भौमितिक संरचनेच्या भव्य शिल्परचना अन्यत्र कोठेही आढळून येत नाहीत. जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दशर्वणारी देवाचे गोठणे हे भारतातील एकमेव ठिकाण आहे. आढळून आलेल्या सर्व ठिकाणांवरील किमान एक रचना अन्यत्र आढळणाऱ्या रचनांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com